हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावामध्ये सौ. माधुरी अण्णासो जाधव आणि आण्णासो जाधव यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, महिलांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी येथे महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. गावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे गावातील बचत गटाच्या आणि गावातील महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती .यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने आणि माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या पत्नी लेखा मिणचेकर याही उपस्थित होत्या.
या स्नेहमेळाव्यात विवाध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये वृद्धमहीलांनीही मोठा सहभाग नोंदवला .कार्यक्रमात ॲडव्होकेट सुप्रीया सुर्वे यांनी महीलांचे प्रबोधनपर व्याख्यान दिले.तर मोनीका जाजु यांनी महीलांना खुप हसवत फनीगेम्स घेतल्या.
गावात पहील्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महीलांसाठी स्नेहमेळावा घेण्यात आला.त्यामुळे हजारो महीलांनी सौ.माधुरी जाधव आणि आण्णासो जाधव यांना शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनिका जाजु यांनी तर प्रास्ताविक माधुरी जाधव यांनी केले.सौ.वेदांतिका माने,सौ.सुलेखा मिनचेकर ,तळंदगे गावच्या सरपंच जयश्री भोजकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभा भोजे आदींनी मनोगत व्यक्त केले .सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शिरोळे यांचेसह हजारो महीलांनी या कार्यक्रमास उत्स्फुर्त हजेरी लावली.