हेरले / प्रतिनिधी
गरजू आणि गरिबांना मदत करणे व निराधारांना आधार देणे हेच खरं समाजकार्य असल्याचे मत संजय गांधी कमिटीचे सदस्य डॉ. विजय गोरड यांनी हेरले (ता. हातकणंगले) येथे झालेल्या संजय गांधी मंजूर आदेश पत्राचे वाटप करताना व्यक्त केले.
संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष व के. डी. सी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हेरले व मौजे वडगाव येथील संजय गांधी विधवा, श्रावण बाळ,अपंग,मूकबधिर, कर्णबधिर लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक तलाठी श एस. ए बरगाले यांनी केले व आभार बाळासाहेब भोसले यांनी मानले.याप्रसंगी हेरले व मौजे वडगाव येथील लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
हेरले येथे झालेल्या संजय गांधी मंजूर आदेश पत्राचे वाटप करताना संजय गांधी कमिटी हातकणंगले चे सदस्य डॉ. विजय गोरड सोबत तलाठी एस.ए. बरगाले व बाळासाहेब भोसले.