कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या कार्यालयावर
आंदोलन ९ वा दिवस व आक्रोश मोर्चा
काढून मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक आर. जी. चौगले यांना देण्यात आले.
सदरचा आक्रोश मोर्चास दुपारी १२.०० वाजता दसरा चौकातून सुरुवात होवून बिंदू चौक, शिवाजी पुतळा, माळकर तिकटी मार्गे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात आला.आक्रोश मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालया जवळ आले नंतर मोर्चाचे सभेत रुपातंर झाले. या वेळी मनोगते एस. डी. लाड, खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड यांनी व्यक्त केले.
लेखी निवेदनातील आशय असा की,महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित २०% ४०% अनुदान घेणाऱ्या त्रुटी पूर्वता केलेल्या तसेच अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे याकरीता ३ मार्च २०२२ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर याठिकाणी आहोत. शासनाने दखल न घेतल्यामुळे आक्रोश मोर्चाद्वारे निवेदन सादर करीत आहे.
उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र शासनाने शिक्षक व कर्मचारी-यांचे अनेक प्रश्नांबाबत बैठक आयोजित केली असून यामध्ये प्राधान्याने महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित २०% व ४०% अनुदान येणा-या त्रुटी पुर्तता केलेल्या तसेच अघोषित असणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा व यामधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण मिळावे.
अनुदान पात्र असणाऱ्या व त्रूटी पूर्तता करून देखील प्रलंबित ठेवलेल्या व अघोषित असणाऱ्या सर्व शाळा, वर्ग तुकडया यांना घोषित करून प्रचलित नियमानुसार १००% अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. याकरीता ३ मार्च २०२२ पासून संपूर्ण राज्यात शिक्षण उपसंचालक कार्यालय याठिकाणी व आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण चालू आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून आमच्या मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरीही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे आज शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी अनवानी पायाने कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रोश मोर्चा काढत आहोत. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हयातील शैक्षणिक व्यासपीठाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळा पूर्णपणे बंद ठेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. शासनाने आमची वेठबिगारी बंद करून न्याय देण्यासाठी आमच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. याबाबत आमच्या संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यामध्ये इ. १० वी व १२ वी च्या पेपर तपासणीवरती बहिष्कार कायम ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत पेपर तपासले जाणार नाहीत. तरी आमच्या मागण्यांबाबत योग्य तो विचार व्हावा अशा
मागण्या महाराष्ट्रातील अंशत: अनुदानित (२०% व ४०%) अघोषित त्रूटी पुर्तता केलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या प्रचलित नियमानुसार १०० टके अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. २) अंशत: अनुदानित (२०% व ४०%) मधील काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवा संरक्षण मिळावे. या संदर्भात अशा आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, खंडेराव जगदाळे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाळासाहेब डेळेकर ,बाबासाहेब पाटील,सुरेश संकपाळ, दत्ता पाटील ,प्रा. सी एम गायकवाड, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, डी एस घुगरे, राजेद्र कोरे, उमेश देसाई, राजेंद्र माने, आर डी पाटील, प्रकाश पाटील, गजानन काटकर, सुधाकर सावंत, उदय पाटील, मिलींद पांगिरेकर ,इरफान अन्सारी ,संदीप पाटील ,के के पाटील, काकासाहेब भोकरे, मनोहर परीट,प्रा. हिंदूराव पाटील, मिलींद बारवडे, पंडीत पवार, एन. आर. भोसले,बाजीराव सुतार,एम. एन. पाटील, एस एम पाटील,अरुण मुजुमदार एस. के. पाटील डी पी कदम सौ एम डी घुगरे, सचिन चौगुले आदींनी नेतृत्व केले. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्हयातील महिला शिक्षिका व शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
फोटो
आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक आर. जी. चौगले यांना देतांना एस डी लाड खंडेराव जगदाळे बाबासाहेब पाटील डी एस घुगरे आदीसह अन्य मान्यवर.