हेरले / प्रतिनिधी
5 मार्च व 6 मार्च 2022 रोजी बालेवाडी (पुणे )क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनिअर स्पर्धेत पेटवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत खेळाडूंनी दोन सुवर्ण दोन रौप्य व दोन कास्य पदकांची कमाई केली .या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव शिरगावकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता
यशस्वी विद्यार्थ्यां खालील प्रमाणे:
विक्रांत सोपान थोरात ( सुवर्णपदक) सौजन्य बापूराव भोसले (सुवर्णपदक) जय दत्तात्रय डांगे (रौप्यपदक)
आकाश भिमदेव टेंगले (रौप्यपदक ) समर्थ संतोष अकीवाटे (कास्यपदक)
त्याचबरोबर कु.अलंकार ताकवणे ,सार्थक गायकवाड दुष्यांत शिंदे व किरण सोनवणे या खेळाडूंनी सहभाग नोंदवला.त्यापैकी विक्रांत थोरात व सौजन्य भोसले या दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
वरील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने सर यांची प्रेरणा मिळाली. आनंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशालेचे विभाग प्रमुख श्री एस. जे. सासणे, बी .ए डोंगरे, व्ही. के. आळवेकर एम. आर .पाटील, के. एम .इंगळे यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.