कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. १२/७/१८
मिलींद बारवडे
विदयार्थी दशेतच करिअर निश्चीत करुन यशासाठी अभ्यासाचे कठोर परिश्रम घ्या. निश्चीतच यश प्राप्त होते. मला शाहू हायस्कूलने व माझ्या आईने घडविले. सर्वांना कळस दिसत असतो मात्र पाया घट्ट होण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते अपरिचीत असतात. त्यांचेच कार्य अतुलनीय असते,त्यांचा मीे सदैव कृतज्ञ आहे !असे प्रतिपादन फ्लाइट लेफ्टनंट अक्षय विलास तळप यांनी केले.
श्री शाहू हायस्कूल कागलमध्ये ते फ्लाइट लेप्टनंट झाल्या बद्दल सत्कार समारंभ आयोजीत केला होता. त्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.बी. रुग्गे होते.
आपला परिचय करून देतांना म्हणाले की, मी शाहू हायगस्कूलचा विद्यार्थी आहे . दहावी पर्यंतचे शिक्षण शाहू हायस्कूलमधून ९५.०९ मार्क्स मिळवून पूर्ण झाले . बारावी सायन्सचे शिक्षण विवेकानंद कॉलेज कोल्हापूर मधून घेतले मी १२ वी सायन्स ८९.५० टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालो. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये प्रवेश घेतला. तिथेही सातत्याने चार वर्षे प्रथम १० विद्यार्थ्यांमध्ये राहिले . इंजिनीअरिंगचे शिक्षण मी ८३ टक्के मार्क फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवून पूर्ण केले .आरआयटी इस्लामपूर कॉलेजच्या कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमधून त्यांची भारत फोर्ज इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये सिलेक्शन झाले . एक महिना कंपनीमध्ये काम केले त्यावेळी स्पर्धा परीक्षेमधून इंडियन एअर कोर्समध्ये क्लास १ गॅझेटेड ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले. २ जुलै २०१६ ते फ्लाइंग ऑफिसर म्हणून जॉईन झाले .
सहा महिने एअरफोर्स अॅकेडमी हैदराबादमधून बेसीक ट्रेनिंग पूर्ण केले. नंतर एक वर्ष एअरफोर्स टेक्निकल कॉलेज बेंगळुरूमधून टेक्निकल ट्रेनिंग संपादन केले. त्यानंतर त्यांची इंडियन एअरफोर्सच्या जागावर डीप पेनिट्रेशन स्ट्राइक बॉम्बर एअरक्रॉफ्टचा स्क्वॉर्डन मध्ये निवड झाली . सहा महिने फ्लाइंग ऑफिसर म्हणून एअरफोर्स स्टेशन गोरखपूर उत्तर प्रदेश येथे कामकाज पाहिले आणि नुकतीच फ्लाइंग ऑफिसर वरुन फ्लाइट लेफ्टनंट पदावर प्रमोशन झाले आहे. आणि ते सध्या टेक्निकल ऑफिसर म्हणून एअरफोर्स स्टेशन जामनगर गुजरातमध्ये कार्यरत आहेत.
स्वागत महेश शेडबाळे यांनी केले. प्रास्ताविक सुभाष भोसले यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका एस.ए. कुलकर्णी, जगन्नाथ भोसले, श्रीमती तळप, संजय पोतदार, एस.वाय. बेलेकर, शंकर खाडे,काका भोकरे, महादेव घोरपडे,कादर जमादार, रमजान कराडे,आदीसह शिक्षकवृंद, विदयार्थी उपस्थित होते. आभार उपमुख्याध्यापक आर.जी. देशमाने यांनी मानले.
फोटो
श्री शाहू हायस्कूलमध्ये फ्लाइट लेप्टनंट अक्षय तळप यांचा सत्कार करतांना प्राचार्य एम.बी. रुग्गे व इतर मान्यवर