शिरोली/ प्रतिनिधी दि. २३/७/१८
अवधूत मुसळे
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कु. निलोफर मुबारक बारगीर या विद्यार्थीनीने लातूर येथे महाविद्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गावामध्ये समस्त मुस्लिम समाज व सर्वपक्षीयांच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला.
मौजे वडगाव येथील विद्यार्थीनी कु . निलोफर बारगीर हि लातूर येथील श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकत होती. तेथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी केलेला मानसिक त्रासामुळे दि १७ जुलै रोजी या विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली .आत्महत्येस जबाबदार संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मृत निलोफर बारगीर हिच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा या मागणीसाठी मौजे वडगावमध्ये समस्त मुस्लीम समाज व सर्व पक्षीयांच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढून कॉलेज प्रशासनाचा निषेध व्यकत करण्यात आला.
यावेळी शब्बीर हजारी, डॉ .आमिर हजारी, रांझा पटेल, आमिर हमजा हजारी, अलिम हजारी, बाळासो बारगीर हिंमत बारगीर, सरपंच काशीनाथ कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे, निवास शेंडगे, डॉ . विजय गोरड, प्रकाश कांबरे 'नितिन घोरपडे , आदी सह मुस्लीम समाजातील महिला, मुले, पुरुष, विविध पक्षांचे पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते .
फोटो
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील मुस्लीम समाज व . सर्वपक्षीयांच्या वतीने गावातून मुकमोर्चा काढला .