माजगाव वार्ताहर:—दि.०७/०७/२०१८
|| वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी || हा ज्ञानोबारायांचा अभंग आचरणात आणण्याचा प्रयत्न कन्या वि.मं.पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर.या शाळेतील चिमुकल्यांनी केला.शाळेमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. गावचे सरपंच श्री.गणा जाधव यांनी सर्व गाव व शाळा परीसर स्वच्छ व सुंदर करण्याचा मनोदय व्यक्त केला.या कार्यक्रमाचा मुहुर्त शाळेपासुन केला.
या निमित्ताने सर्व गावातून वृक्षदिंडीची मिरवणुक काढणेत आली.या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य श्री.शिवाजीराव चेचर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन घाडगे ,कन्या वि.मं.पोर्ले शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस.चौगले सर,श्री.गणपती मांडवकर सर,श्री.प्रकाश पोवार सर,श्री.नामदेव पोवार सर,श्री.बाजीराव कदम सर,श्री कोरे सर,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामस्थ ,उपस्थित होते.
1 comments:
Write commentsचांगला उपक्रम
Reply