कोल्हापूर / प्रतिनिधी दि. २३/७/१८
मिलींद बारवडे
१ नोव्हेबंर २००५पूर्वीच्या नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे (जी.पी.एफ. ) खाते सुरू करावे या बाबत स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सेवाभावी संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, कोल्हापूर जिल्ह्यातील १ नोव्हेबंर २००५ पूर्वीच्या नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. मात्र त्यांचे अजूनही भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सहावा वेतन आयोगाच्या पाच हाप्त्यांची रक्कम अधांतरीच आहे. राज्यातील नागपूर ,औरंगाबाद, नाशीक या विभागात उच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशनुसार संबधित कर्मचाऱ्यांची खाती उघडली आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची खाती न उघडल्याने भविषाच्या आर्थिक तरतूदी बद्दल वंचित आहेत.
या निवेदनाचा शिक्षण विभागाने हितकारक विचार करून तात्काळ संबधित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडावेत असे लेखी निवेदन शिक्षण उपसंचालक किरण लोहार व भविष्य निर्वाह निधी व वेतनपथक विभाग अधिक्षक शंकराव मोरे यांना स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले.
यावे वेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे ,जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हा उपाध्यक्ष मुख्याध्यापक डी. ए.जाधव, के.के. पाटील, उदय पाटील, आर.डी. पाटील,संदिप पाटील, राकेश चव्हाण, संजय कांबळे, मुख्याध्यापक सी.बी. कुंभार, बी.के. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांना स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे निवेदन देतांना शेजारी जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. जाधव व अन्य शिक्षक नेते