कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील.
दि. 28 जुलै 2018
कोल्हापूर ही जशी कलानगरी आहे तशीच चाहत्यांचीही नगरी आहे. इथे एखाद्या कलाकाराला डोक्यावर घेतले तर आयुष्यभर त्याच्या स्मृती जागवल्या जातात.
स्व. मोहम्मद रफी आपल्यातून जाऊन 38 वर्षे झाली तरीही त्यांच्या जादुई आवाजातून ते आजही आपल्यात असल्याचे जाणवते. त्यांच्या अडतीसाव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दिनांक 31 जुलै 2018 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता
- - - आदमी मुसाफिर है - - -
या सुरमई मैफिलीचे आयोजन अक्कमहादेवी मंडप [ सांस्कृतिक हॉल ] या ठिकाणी करण्यात आले आहे.
रफी यांच्या चाहत्यांसाठी रफींच्या आठवणींना जागविणेसाठी त्यांनी गायलेल्या हजारो अनमोल गीतांमधून निवडक गाण्यांवर आधारीत आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन स्वरविलास मंचाचे श्री विलास पोवार यांनी केले आहे. या कार्यक्रमाला श्री मोहन सालपे नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
खास जेष्ठ नागरिकांना सोयीसाठी कोल्हापूर मध्यवर्ती ठिकाणी व जीने चढायला न लागणारे ठिकाणी विनामूल्य अशा आदरांजली मैफिलीचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा.
3 comments
Write commentsछान आहे
ReplyVery nice
ReplyVilas rao congratulations!💐👍
Reply