हेरले / प्रतिनिधी दि. १७/७/१८
कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर चोकाक- माले ( ता. हातकणंगले ) दरम्यान केएमटी व हुडांई मोटरकार यांच्यात अपघात होऊन कारचे मोठे नुकसान झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान झाला.सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, उत्तम आमुरसकर हुंडाई मोटारकार (क्र. एम.एच.०९ डी.ए. ४९५९) घेऊन कोल्हापूरहून सांगलीकडे जात होते. ते चोकाक मालेच्या दरम्यान आले असता अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने कार दुभाजकावरून पलीकडे जाऊन कोल्हापूरकडे जाणारी केएमटी बस ( क्र. एम.एच. ०९बी.सी. २१६७) ला धडक दिली. दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत वाहनांची धडक चुकविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोटारकार रस्त्याच्या बाजूला जाऊन शेतवडीत गेली, तर केएमटी बस चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी घेतली. या अपघातामध्ये मोटारकारचे पुढील व मागील बाजूचे नुकसान मोठया प्रमाणात झाले. तर केएमटीचे चालकाकडील बाजूचे नुकसान झाले. दोन्ही चालकानी प्रसंगावधान राखल्याने कोणी जखमी झाले नाही. अपघाताची माहिती हातकणंगले पोलीसाना मिळताच अपघात स्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फोटो
चोकाक - माले दरम्यान हुडांई मोटरकारचा अपघात होऊन शेतवडीत घुसली