हेरले / प्रतिनिधी दि ४-०७-२०१८
चोकाक ( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व कृषिकन्यांच्या वतीने कृषि दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. यावेळी कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी व्याख्याते डॉ.नितीश ओझा यांनी सेंद्रिय शेती तसेच देशी गाई पासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकांचे दैनंदिन जीवनातील महत्व समजावुन दिले.तसेच 'शेतकरी गाईला पाळत नसून गाई शेतकऱ्यांना पाळते'हे विविध उदाहरणातुन शेतकऱ्यांना समजून संघितले.
कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषिकन्यांचे ग्रामपंचायत मार्फ़त स्वागत करण्यात आले.माती परीक्षण,बीज प्रक्रिया ,लागवड,तंत्रज्ञान,यासह शेतकरी, बचत गट, सहकारी सेवा संस्था यांना एकत्र करुण त्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे
कृषिकन्या गरशोम, हर्षा,वृषाली,सानिया ,तेजस्वी, माहेश्वरी, ह्या सर्व उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांशी सवांद साधुन मार्गदर्शन करणार आहेत
ग्रामपंचायतच्या वतीने दमदार पावसाची सुरूवातीनंतर ४५० विविध वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.यावेळी कृषि दिनानिमित्त विद्या मंदिर चोकाक,ग्रामपंचायत च्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले.यावेळी सरपंच मनिषा पाटील, उपसरपंच विकास चव्हाण, सचिन पाटील ,ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचाय सदस्य उपस्थित होते.