कोल्हापूर प्रतिनिधी.दि. 29 जुलै 2018
महावितरण कंपनीने 2017-18 आर्थिक वर्षासाठी कृषी, घरगुती वीज व लघु औद्योगिक वीज वापर करणाऱ्या सर्व सामान्य ग्राहकांवर अन्याय करीत वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. यामुळे घरगुती वीज वापरणारे ग्राहक, शेतकरी आणि उद्योजक यांचे कंबरडे मोडणार आहे. प्रस्तावित दरवाढीमध्ये घरगुती वीज ग्राहकांसाठी 17 टक्के तर शेती पंपांसाठी 76 टक्के एवढी दरवाढ प्रस्तावित केली आहे. महावितरण आयोगाने निश्चित केलेला औद्योगिक वीज दर शेजारील राज्यांच्या तुलनेने 25 ते 35 टक्के एवढा ज्यादा आहे.
महाराष्ट्रातील घरगुती व्यापारी आणि शेतकरी ग्राहकांसाठीचा वीज दर देशातील सर्वाधिक वीज दर पातळीचे जवळपास पोचला आहे प्रत्यक्षात वीजगळती, वीजचोरी आणि महावितरणची अकार्यक्षमता तसेच महसुली तोटा भरून काढण्यासाठी ही वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीची माहिती सोबत अपलोड केलेल्या इमेज मधील तक्त्यामध्ये उपलब्ध आहे
त्यामुळे एक दक्ष ग्राहक म्हणून या वीज दरवाढीला आपण सर्वांनी विरोध करणे गरजेचे आहे. आपणा सर्वांची संघटित ताकद नक्कीच ही वीज दरवाढ रोखण्यासाठी आवश्यक आहे. असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील यांनी केले आहे
यासाठी आपली प्रस्तावित वीज दर वाढ विरोधी हरकत mercindia@merc.gov.in आणि satejpatiloffice@gmail.com या E-mail वर पाठवावा.. हा E-mail पाठविण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१८ आहे.