Friday 20 July 2018

mh9 NEWS

शासनाच्या शिक्षक भरती पवित्र पोर्टल विरोधात  संस्थाचालकांचा एल्गार ! १० ऑगस्टपासून राज्यातील सर्व शाळा  बेमुदत बंद करण्याचा निर्णय.

सुधाकर निर्मळे / भाऊसाहेब सकट   /

 मिलींद बारवडे  

कोल्हापूर / प्रतिनिधी


                                                         


            शिक्षक भरती पवित्र पोर्टलची होळी


लोकप्रतिनिधी,पालक शिक्षक समाज प्रबोधन, ४ ऑगस्ट बालेवाडी पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारणी सभेत आंदोलनाची पुढील दिशा, १० ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शाळा बेमुदत  बंद आंदोलन, कायदेशीर मार्गाने पवित्र पोर्टल विरोधात लढाई  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी  संस्थाचालकांच्या  महामेळाव्यात आंदोलनाचे पाच टप्पे जाहीर करून आंदोलनाचे रणशिंग फुकले. प्रमुख उपस्थिती जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांची होती.

       श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसमध्ये कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने सभा झाली. या सभेत शासनाचे पवित्र पोर्टल संस्थाचालकांच्या हक्काच्या मुळावर कसे आहे. या बद्दल सविस्तर चर्चा झाली.

    

  संस्थाचालकांना चोर, लुटारू ,समजून सर्व संस्थाचालकांना एकाच नजरेने पाहण्याच्या  शासनाच्या दृष्टिकोनामुळे शिक्षणमंत्री सातत्याने शिक्षण क्षेत्रावर अन्यायकारक निर्णय लादत आहेत. संस्थाचालकांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासाठी त्यांनी या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरु केली आहे . संस्थांनी सुरू केलेल्या प्राथमिक ,माध्यमिक, शाळांतील शिक्षण हे  संस्थाचालक व शिक्षक यांच्यातील  चांगल्या समन्वयामुळेच महाराष्ट्र राज्यात खरी शैक्षणिक प्रगती झाली आहे. स्वातंत्र्यानंतर खासगी शिक्षण संस्थांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळांची स्थापना करून शहरातच नव्हे तर ग्रामीण व दुर्गम भागात बहुजन समाजातील मुला मुलींसाठी शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे . इ.१०  व  १२  बोर्ड परीक्षांच्या निकालावरून हे स्पष्ट दिसते.

     २ मे २०१२ नंतर नियुक्त करण्यात आलेले पूर्णवेळ, अर्धवेळ शिक्षक यांच्या मान्यतेचे प्रश्न प्रलंबित असून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्यास अशा शिक्षकांच्या मान्यतेवर गडांतर येणार असल्याने अनेक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत .संस्थेच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. असे असतानाही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण खात्याने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टल विरुद्ध नागपूर खंडपीठात केस दाखल करण्यात आली आहे .संस्थाचालकांचे अधिकार अबाधित राहावेत व पूर्वीप्रमाणेच त्यांना शिक्षक भरतीचे अधिकार असले पाहिजेत.

      संस्थाचालकांचे  शासनाकडे यापूर्वीचे अनेक प्रश्न प्रलंबित असतानाच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती राबवली जाणार आहे. या प्रणालीमध्ये अनेक जाचक अटी आहेत , तसेच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण विभागाकडून केली जाणारी भरती प्रक्रिया संस्थाचालकांच्या अधिकारावर  गदा आणणारी आहे. शिक्षण संस्थाचालकांचे शिक्षक भरतीचे अधिकार पूर्णपणे काढून घेतले जाणार आहेत . त्यामुळे याला संस्थाचालक व शैक्षणिक व्यासपिठाचा तीव्र विरोध आहे .स्वागत व प्रास्ताविक शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड यांनी केले.

    

 यावेळी माजी आमदार राजीव आवळे, वीरेंद्र मंडलिक ,जयकुमार कोल्हे ,आर. व्ही. देसाई, शिक्षण सभापती अमरिशसिंह घाटगे, डॉ.युवराज भोसले, जी.एन. सामंत, के.वाय.कोळेकर, एम.के. पाटील, व. ज. देशमुख, जयंत आसगावकर , मानसिंग बोंद्रे, राजेंद्र माने, जे.के. माळी, दत्तात्रय गाडवे, अशोक पाटील ( (तात्या ) दादासाहे लाड, ,रणजित पाटील, डी.एस. घुगरे, डॉ. विरेंद्र वडेर, के.के. पाटील, उदय पाटील, संदिप पाटील, समिर घोरपडे,रंगराव तोरस्कर, एन.आर. भोसले, प्रभाकर हेरवाडे, नंदकुमार इनामदार, महेश कळेकर, बाबासाहेब पाटील, मारूती पाटील, सतिश घाळी, सुरेश पाटील, मिलींद पांगीरेकर, सुंदरराव देसाई, पंडीत पोवार, शिवाजी कोरवी, बी.जी. बोराडे, राजाराम वरूटे, पी.एस. हेरवाडे, बी.जी. काटे, साताप्पा कांबळे, अे.आर. पाटील, विष्णू पाटील, प्रताप देशमुख, पी.डी. शिंदे,  बाबा पाटील, आर. वाय पाटील,आदी प्रमुख मान्यवरांसह पाच जिल्हयातील संस्थाचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.सी.एम. गायकवाड यांनी केले. आभार व्ही.जी. पोवार यांनी मानले.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :