हेरले / प्रतिनिधी दि. ३/७/१८
हातकणंगले तालूक्यातील चोकाक येथे चोरट्यांनी सौर ऊर्जेच्या बॅटरी चोरून नेल्या. या घटनेने गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सोमवार मध्यरात्री घडली.
चोकाक ग्रामपंचायतीने गावामध्ये जखुबाई मंदिर,सुनील सांगावे,भूपाल सांगावे,कुंभार गल्ली, नागेश कांबळे,समाज मंदिर ,स्मशानभूमी,अविनाश मोरे,बस थांबा आदी एकूण ११ ठिकाणी सौर पथ दिवे बसविले होते. सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी या पथदिव्यांच्या बॅटऱ्या चोरून न्हेल्या.अंदाजे एक लाखापर्यंत या बॅटरींची किंमत आहे.याबाबत चोरीची तक्रार हातकाणंगले पोलीस ठाणे येथे सरपंच मनिषा पाटील, उपसरपंच विश्वास चव्हाण व योगेश चोकाककर यांनी केली आहे. अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.