माजगांव प्रतिनिधी:—
पंचायत समिती पन्हाळा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशीत शिक्षण योजनेतून दृष्टीदोष असलेल्या मुलांना ठळक लिपी पुस्तकाच्या संचाचे वाटप कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर या शाळेमध्ये वितरीत करण्यात आला.
पन्हाळा पंचायत समितीकडे प्राप्त झालेले २८ ठळक लिपी संच तालुक्यातील दिव्यांग मुलांपैकी दृष्टीदोष असलेल्या मुलांपर्यंत पोहचवणार असलेचे सांगीतले.शासनाची प्रत्येक योजना गरजू विद्यार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी कटीबद्ध असलेचे मत अंजली सुभाष लोकरे मॅडम(विषयतज्ञ् समावेशित शिक्षण,पंचायत समिती पन्हाळा)यांनी व्यक्त केले.
यावेळी मांडवकर सर,पोवार सर,नामदेव पोवार सर, जाधव सर, लोखंडे मॅडम, बाजीराव कदम सर, कोरे सर उपस्थित होते.