माजगांव वार्ताहर— बाजीराव कदम
पन्हाळा पश्चिम भागामध्ये वसलेले एक टुमदार गाव.गाव तस सधन,पण ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे नदीमध्ये मुबलक पाणी असुनसुद्धा गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावाचा पाणी पुरवठा
गेल्या ४८ तासामध्ये गावातील नळांना पाणी आलेले नाही,पण गावच्या मुख्य रस्त्यावरुन हजारो लिटर सांड पाणी गटारातुन परत नदीमध्ये मिसळत अाहे.त्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होण्यास हातभार लागत आहे.तसेच हे गटारी तुंबुन हे पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रोगराई वाढण्याची व अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
तरी,प्रशासनाने या समस्येमध्ये लक्ष घालून समस्त नागरिकांचा शारिरीक,आर्थिक,सामाजिक त्रास संपवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.