हेरले / प्रतिनिधी दि. १४/३ / १८
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची सभा मुंबई येथील शिवतिर्थवर रविवार दि. १८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसांचे नूतन वर्ष गुढीपाडवा दिनापासून सुरूवात होते. याचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे मुंबई मधील शिवतिर्थावर रविवार दि. १८ मार्च गुढीपाडव्या दिनी सायंकाळी सहा वाजता जाहिर सभेतून मनसे सैनिकांना संबोधणार आहेत. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणिस, तालूका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, शाखा अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शाखेची एक गाडी घेऊन मोठया संख्येंनी मनसे सैनिकांनी मुंबईच्या सभेस उपस्थित राहावे. असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.