कागल / प्रतिनिधी दि. ६/३/१८
भरकटलेल्या शिक्षणव्यवस्थेला पत्रकारितेच्या माध्यमातून दिशा देणारे आदर्शवत व्यक्तिमत्त्व म्हणजे सुधाकर निर्मळे असे गौरवोध्दार महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी काढले.
ग्रामीण विभागातील पत्रकारांना संघटित करुन केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पत्रकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व्हन्नूर ता. कागल येथे आयोजित समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम होत्या. तर प्रमुख उपस्थित म्हणून ५ महाराष्ट्र बटालियनचे कमांडर ऑफिसर आर.के.तिम्मापूर व आदर्श शिक्षण समुहाचे संस्थापक डी.एस.घुगरे होते.
यावेळी सुधाकर निर्मळे यांनी शिक्षणक्षेत्रातील सर्व पत्रकारांना एकत्रित करुन समस्यांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले. या समारंभास नागनाथ विद्यालय एकोंडीचे मुख्याध्यापक एस.टी.चौगुले, प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल सिद्धनेर्लीच्या मुख्याध्यापिका सुनंदा पोवार, सरपंच सुरेखा कांबळे, उपसरपंच संदिप लोंढे, पोलिस पाटील अश्विनी माने, राष्ट्रपती पारितोषिक विजेते लवाटे गुरुजी उपस्थित होते. स्वागत जितेंद्र सावंत यांनी केले. आभार निर्मला यादव यांनी मानले .
फोटो
कमांडिंग ऑफिसर कर्नल आर. के.तिम्मापूर एनसीसी अधिकारी सुधाकर निर्मळे यांचा सत्कार करतांना.