कोल्हापूर प्रतिनिधी - संदीप पोवार
कसबा बावडा येथील पॅव्हिलियन मैदानाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सध्या सुरू आहे. येथे राजरोसपणे तळीराम दारू पिऊन बाटल्या फोडतात यामध्ये दोष कोणाला द्यायचा दारू पिणाऱ्यांना की नगरपालिकेच्या कर्मचार्यांना ?
कll बावड़ा ग्राउंडवर सध्या नुतनीकरण सुरु आहे. समोर महापालिकेचे ऑफिस असून सुद्धा काही दारुडी मंडळी ग्राउंडवर ठिय्या मांडून खुशाल दारु पित बसतात आणि रिकाम्या झालेल्या बाटल्या अन ग्लास तसेच ठेवून जातात. काही वेळा बाटल्या फोडतात.
पालिकेच्या कर्मचाऱ्याला याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की तो म्हणाला कोण बोलणार ? कारण पिऊ नका म्हटले तर वाद-विवाद घालून मारहाण करतात.
महानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.