कोल्हापूर प्रतिनिधी दि. २६/३/१८
शिक्षणातील स्वयंभू ता- यांचा शोध घेवून त्यांना स्टार मानांकन करणारी संस्था म्हणजे स्टार अॅकॅडमी, त्याचे हे कार्य शिक्षणाला पालवी देणार आहे . असे गौरव उदगार प्राचार्य डॉ.विकास सलगर यांनी स्टार गौरव सोहळ्यात काढले.
ते स्टार अॅकॅडमीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी बोलत होते. शाहू स्मारक भवनामध्ये मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला.प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष दिपक शेटे म्हणाले स्टार अॅकॅडमीचा उद्देश विषद करीत संस्थाचालक ते शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुरस्कार देणारी स्टार अॅकॅडमी ही महाराष्ट्रातील पहीली संस्था आहे असे त्यांनी नमुद केले . संस्थाचालक जयंत आसगावकर मनोगतात म्हणाले आम्हाला स्टार अॅकॅडमीने स्टार केले पण खरच ही संस्था सुपरस्टार आहे . सातारा शिक्षण अधिकारीपदी नियुक्ती आण्णासाहेब मगदूम यांची झाले बद्दल सत्कार अध्यक्ष दिपक शेटे यांनी केला .
आदर्श संस्था समुहाचे अध्यक्ष डी.एस. घुगरे यांनी स्टार अॅकॅडमीचा पुरस्कार भविष्यात राष्ट्रीय मानांकन पुरस्कार होतील असे मत मांडले यावेळी योगा ,रोप जंप, स्टेज गीते , भारुड , गणेशकृती निर्मिती यांची प्रात्यक्षिके झाली .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संदिप व्हनाळे व सायली कोरे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी मानले .
स्टार अॅकॅडमी यांच्या मार्फत शैक्षणिक क्षेत्रातील स्टार संस्थापक पुरस्कार संस्थाचालक प्रा. जयंत आसगावकर, अशोक चराटी, अशोक पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले. स्टार उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार सुधाकर निर्मळे ( कागल) अशोक कांबळे ( म्हाळुंगे), राहुल फुटाणे (कडगांव) स्टार मुख्याध्यापक पुरस्कार -भगवंत पाटील (करवीर) सुरैय्या मुजावर (रुकडी), संतोष पाटील (कागल) स्टार आदर्श शाळा पुरस्कार श्री बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगांव, विद्या मंदिर भैरेवाडी सावर्डे बुद्रुक स्टार आदर्श शिक्षक पुरस्कार -भारत सावळवाडे ( दत्तवाड) इकबाल मुजावर (कागल), महेश सुर्यवंशी ( कोल्हापूर ) स्टार शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार-बजरंग गरूड ( गडहिंग्लज), पांडुरंग जाधव ( कसबा वाळवे ) आदी शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करणाऱ्यात आले.
या प्रसंगी दै. पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव , प्राचार्य डॉ.विकास सलगर, शिक्षणाधिकारी आण्णासाहेब मगदूम , एस डी लाड, दादा लाड, व्ही जी पोवार , डी एस घुगरे , अभय वंटी , आर वाय पाटील , दिपक शेटे , शिवाजी पाटील ,इ. मान्यवर , शिक्षक उपस्थित होते.
फोटो
स्टार अॅकॅडमीचे शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सोबत प्रमुख मान्यवर.