कोल्हापूर प्रतिनिधी ः
पेठवडगाव येथील विजयादेवी यादव प्री-प्रायमरी स्कूल व डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार दि. 03/03/2018 रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठया उत्साहात पार पडला. डॉ पूनावाला स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षात 2017-18 मध्ये विविध अभ्यास व अभ्यासेत्तर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध अभ्यासपूरक स्पर्धामध्ये विद्यार्थ्यानी भाग घेवून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ निवृत्त डी.वाय.एस्.पी. श्री व्ही.एस्. चौगुले, श्री. संदिप सुर्यवंशी संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिवा सौ. विद्या पोळ यांच्यासह संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना श्री संदिप सूर्यवंशी म्हणाले की विद्यार्थ्यांनी वाचन लेखन या कलेबरोबरच अभ्यासपूरक उपक्रमाध्ये भाग घेवून आपला विकास साधावा ‘सर्वागिण विकासासाठी सहशैक्षणिक उपक्रमांचा फायदा करून घ्यावा व स्वतःला सिध्द करून दाखवावे असा उपदेश ही त्यांनी केला व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतान श्री. व्ही.एस.चौगुले म्हणाले की विद्यार्थ्यानी आधुनिक तंत्रज्ञानाने भरलेल्या या प्रशालेत विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन शाळेची ओळख जगाच्या नकाषावर करावी. कष्ट, जिद्द, चिकाटी, सराव यातून यश हमखास मिळते असा मौलिक उपदेष ही त्यांनी दिला व यषस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले .
सरस्वती प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तदनंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यामध्ये वर्षातील सर्व स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्याना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल व ब्रॉन्झ मेडल तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विज्ञान आर्ट क्राफ्ट प्रदर्शनातील पहिल्या तीन प्रयोग व उपकरणाना बक्षीसेही देण्यात आलीत. सहभागी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वर्षातील 100 टक्के उपस्थिती, उत्कृष्ट वर्ग, जनरल चॅम्पियनषिप या पुरस्काराचे हीवितरण करण्यात आले.
सन 2017-18 वर्षातील आदर्श विद्यार्थी व पालक पुढील प्रमाणे
प्री-प्रायमरी विभाग - - कु. उर्वी विषाल बेले
प्रायमरी विभाग - - कु. जिया फिरोज अत्तार
सेकंडरी विभाग - कु. शर्वरी मिलिंद कुंभार
उच्च माध्य.विभाग - कु.अभिषेक अंकुष कोलप
या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, फिरते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
आदर्श पालक प्री-प्रायमरी विभाग - - श्री/सौ. अजितसिंह जाधव
प्रायमरी विभाग - - श्री/सौ. ज्ञानराज पाटील
सेकंडरी विभाग - श्री/सौ. प्रल्हाद खवरे
उच्च माध्य.विभाग - श्री/सौ. मानसिंग भोसले
बोर्डर पालक - श्री/सौ. ईष्वर पटेल
या आदर्श पालकांना शाल, श्रीफळ, व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव सचिवा सौ. विद्या पोळ यांच्यासह संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांच्यासह सर्व पालक व विद्यार्थी उल्लेखनिय संख्योने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. स्नेहल नावेकर व आश्लेषा पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन अर्नव पाटील, संजना देवकर यांनी केले. निता मोरे यांनी आभार प्रदर्शन केले व वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.