उदगांव / प्रतिनिधी
कोल्हापूर डीस्ट्रीक रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन संलग्न असलेल्या उदगांव-अर्जुनवाड पत्रकार संघ, उदगांव यांच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उत्तुंग असे काम करणां-या व्यक्तींचा “महिला दिनाचे” औचित्य साधून , पुरस्कार वितरण व गौरव सोहळा कार्यक्रम कोल्हापूर डीस्ट्रीक रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या अघ्यक्षेतेखाली तर पोलिस अधिक्षक गुन्हा अन्वेषण कोल्हापुर डॉ. दिनेश बारी यांच्या प्रमुख उपस्थित सोमवारी दिनांक 12 मार्च रोजी सायकांळी 4 वाजता उदगांव ग्रामपंचायतच्या पटांगणात कार्यक्रम होणार आहे.
कोल्हापूर डीस्ट्रीक रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यातुन शिरोळ तालूक्यात उदगांव अर्जुनवाड पत्रकार संघ कार्यरत आहे. उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाड, कनवाड, कुटवाड, घालवाड यासह परीसरातील गावात पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना अनेक सामाजिक काम करताना दिसतात. त्यामुळे यांच्या गौरव करण्याच्या दृष्टीने उदगांव अर्जुनवाड पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण व गौरव सोहळा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर डीस्ट्रीक रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. सुधाकर निर्मळे, पोलिस अधीक्षक गुन्हा अन्वेषण कोल्हापुर मा.श्री. डॉ. दिनेश बारी, दैनिक महानकार्यचे संपादक मा.श्री.विजय पवार, मा.श्री.जयसिंगपुरचे पोलिस उपअधिक्षक मा.श्री. कृष्णात पिंगळे, जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.श्री.दत्तात्रय कदम, जयसिंगपूर दैनिक सकाळचे प्रतिनिधी तथा शिरोळ तालूका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री. गणेश शिंदे, वेलफेअरचे उपाध्यक्ष मा.श्री. अभिजीत कुलकर्णी, वेलफेअरचे सचिव मा.श्री. सुरेश पाटील, वेलफेअरचे मा.श्री सुरेश कांबरे , वेलफेअरचे मा.श्री. लक्ष्मण कांबरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरं व विविध गावातील सरपंच यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्नं होणार आहे.
तर उदगांव पत्रकार संघाचे अघ्यक्ष इजाजखान पठाण, उपाध्यक्ष सागर माने, कार्याध्यक्ष संतोष बिडवे, अरुणकुमार चौगुले, अजित चौगुले, संतोष बामणे, निनाद मिरजे, विनोद पाटील, राहुल मांगुरकर, उध्दव मगदुम, रवि पाटील, सागर कोळी यांच्याकडुन कार्यक्रमाचे नियोजन सुरु आहे. तरी सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त मान्यवर
· मा.श्री.सागर कदम-उदगांव (समाजभुषण),
मा.श्री. वैघ.डॉ.अनंत कुलकुर्णी-जयसिंगपूर (उत्कृष्ट शिक्षक प्रसारक),
मा.श्री.पृथ्वीराज यादव-शिरोळ ( उत्कृष्ट लोकप्रतिनिधी),
मा.श्री. सुरेश कांबळे-अर्जुनवाड (कृषी उद्योजक ),
मा.सौ.शिलाताई कोळी-कुटवाड (हिरकणी),
मा.सौ. भाग्यश्री केदार-चिंचवाड (उत्कृष्ट प्रशासक प्रतिनिधी),
मा.श्री. भोजलिंग नरळे-धरणगुत्ती ( अन्नदाता),
मा.कु.प्रियंका साळुखे (विशेष गौरव),
मा. कु. सुमित सुतार (उदयन्मुख बालकलाकार)
यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.