सरकार उलथवण्यासाठी हल्लाबोल यशस्वी करणार कार्यकर्त्यांचा निर्धार : शिवानंद माळी
मुरगुड प्रतिनिधी (समीर कटके)
" हर हर मोदी, घर घर मोदी," "अच्छे दिन" सारखे जुमले बाजी करणारे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात कोणताही घटक समाधानी नाही. सर्व स्तरात खदखद आहे. सामान्य लोकांचे जगणं हैराण करणाऱ्या या सरकारचे नाकर्तेपण लोकांच्या समोर आणण्यासाठी हा हल्लबोल एल्गार यशस्वी करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष आणि बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी केले. दि 2 एप्रिल रोजी होणाऱ्या हल्लाबोल सभेचे नियोजनाची माहिती कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवानंद माळी यांनी दिली.
मुरगुड ता कागल येथे प्रविणसिंह पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रविणसिंह पाटील होते.
2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सरकार विरोधी हल्लाबोल यात्रेचा पश्चिम महाराष्ट्र विभागाचा शुभारंभ मुरगुड येथील सभेने होत आहे. या दिवशी मुरगुड ता.कागल गारगोटी ता. भुदरगड आणि कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा सुप्रिया सुळे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनं
जय मुंढे, आम जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, आम सुमनताई पाटील, आम हसन मुश्रीफ आदी उपस्थित राहणार आहेत. सर्व नेते सभेसाठी रविवार दि 1 एप्रिल रोजीच कोल्हापूर येथील शासकीय निवासस्थान येथे दाखल होणार आहेत. 2 एप्रिल रोजी सकाळी 9 वा आंबाबाईच्या दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ होणार आहे. कागल सिद्धनेर्ली केनवडे मार्गे निढोरी येथे सर्व नेतेगण येणार असून तेथे त्यांचे भव्य स्वागत होणार आहे. हजारो मोटरसायकलच्या रॅलीने हा ताफा मुरगुड येथे सभास्थळी येणार आहे. सकाळी दहा वाजता सभेस प्रारंभ होणार आहे. या सभेच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नवी पेठ येथे मुरगुड विद्यालयासमोर 500 फुटाचे भव्य स्टेज उभारण्याचे काम सुरु असून 20000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. थेट प्रक्षेपणासाठी दोन स्क्रीन उभा करण्यात येणार आहेत. जिप मैदानावर पार्किंग व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सोय, फिरते शौचालय अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या सभांमध्ये सर्वात मोठी सभा यशस्वी करण्याचा मानस केला आहे.
मुरगुड हे स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांचे गाव असून आंदोलनाची चळवळ उभे करणारे गाव आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून सत्तारूढ भाजप सरकारला हादरा देण्यासाठी मुरगुड येथेच पहिली सभा घेण्यात आली आहे. असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी डी डी चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. रणजित सूर्यवंशी, संजय मोरबाळे, नगरसेवक राहुल वंडकर, जगन्नाथ पुजारी, पृथ्वीराज चव्हाण, आबासो खराडे, शिवाजी सातवेकर, एम बी मेंडके, पांडुरंग चांदेकर आदी उपस्थित होते.
फोटो : हल्लाबोल यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या नियोजन बैठकीस मार्गदर्शन करताना प्रविणसिंह पाटील, शेजारी
शिवानंद माळी, डी डी चौगले आदी..