पेठ वडगांव / प्रतिनिधी दि. २७/२/१८
स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (सॅम) यांचेवतीने दिनांक ३ व ४ मार्च २०१८ रोजी विरार मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या मिनी राज्य खुल्या स्केटींगसाठी केदार विजय साळुंखे याची निवड झाली आहे.
राज्य स्पर्धा साल २०१८ यासाठी ॲम्युचर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन कोल्हापूर यांचे वतीने दि .२५ रोजी जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये केदार विजय साळुंखे व ५ वर्ष डाॅ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुल पेठवडगाव याची कोल्हापूर जिल्हा संघामध्ये ६ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याला डाॅ. सायरस पुनावाला इंटरनॅशनलस्कुलचे अध्यक्षा सौ विद्याताई पोळ संचालक डाॅ सरदार जाधव प्राचार्या स्नेहल नार्वेकर क्रिडाशिक्षक तसेच छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्रांचे प्रा. महेश कदम, धनश्री कदम यांचे मार्गदर्शन व वडील विजय साळुंखे व आई स्वाती साळुंखे(गायकवाड) यांचे प्रोत्साहन लाभले त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो
केदार साळुंखे याचा सत्कार करतांना माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ व इतर मान्यवर