हेरले / प्रतिनिधी दि. १४/३/१८
सहकारात पतसंस्थांनी सामान्य माणसांना आर्थिक पाठबळ , आधार व न्याय देण्याचे काम केले आहे . या मध्ये हेरले येथील कामधेनू पतसंस्थेने घेतलेली भरारी आणि आर्थिक प्रगती गौरवास्पद आहे या पतसंस्थेने अनेकांचे संसार उभे केले असे मत खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
ते हेरले येथील कामधेनू नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भेटवस्तू वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .या कार्यक्रमप्रसंगी माजी.आमदार प्रकाश आवाडे , आम.डॉ.सुजित मिणचेकर , आम.सतेज पाटील , स्वप्निल आवाडे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी ऊपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कामधेनू पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आदगोंडा पाटील यांनी केले . याप्रसंगी ऊपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू वाटप तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा व अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना खास.राजू शेट्टी म्हणाले, आमच्या चळवळीमूळे शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला आहे . शासन सहकाराकडे वेगळया नजरेने पाहत आहे.ऊस उत्पादक व साखर कारखानदार यांच्यात भांडण लावण्याचे उद्योग करीत आहे.पण चांगल्या कारखानदारांच्या मागे शेतकरी चळवळ पाठीशी असल्याने शेतकरी व कारखानदार एकत्रित येत असून , या सरकारचे कंबरडे मोडल्या शिवाय गप्प राहणार नाही . हे सरकार अच्छे दिन सांगणारे लुच्चे दिवस आणत आहे. अशी घणाघाती टिका खा. शेट्टी यांनी केली
आम. डॉ .सुजित मिणचेकर म्हणाले , सहकाराच जाळं ऊभा करणाऱ्या आवाडे गटात आदगोंडा पाटील हे अभ्यासू नेतृत्व तयार झालं आहे . त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून गावातील वातावरण पोषक ठेवण्याचे व सर्वांचे कल्याण केले आहे.
आम.सतेज पाटील म्हणाले सक्षमपणे , पारदर्शकपणे सहकारक्षेत्र पुढे घेवून जाण्यासाठी आम्ही संघटीत होण्याची भूमिका घेतली असून , शेतकऱ्यांच्या चळवळीला आर्थिक हातभार लावण्या करिता समन्वयाची भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट केले. माजी मंत्री प्रकाश आवाडे पुढे बोलताना म्हणाले आदगोंडा पाटील यांनी सर्वसामान्य शेतकरी, उद्योजकांचे हित 'कामधेनू संस्थेच्या माध्यमातून 'पाहिले आहे . यामुळे ही संस्था भक्कमपणे ऊभी राहिली . आदगोंडा पाटील यांची कोणतेही काम नीट नेटके करण्याची असलेली आवड यामुळे आज 'कामधेनू पतसंस्था' थाटाने उभी आहे , असे गौरवोदगार काढीत सहकार व शेतकरी हिता विरुद्ध शासन निर्णय घेत असेल तर त्याच्या विरोधात राहू अशी भूमिका स्पष्ट केली. संस्थेच्या स्मरणिका प्रकाशन खास.राजू शेट्टी यांच्या हस्ते तर सभासदांना भेटवस्तू वितरण प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या प्रगती मध्ये सहकार्य केलेले, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य , सचिव आप्पासो शेटे यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकामध्ये संस्थापक चेअरमन आदगोंडा पाटील यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा मागोवा घेतला.
या कार्यक्रमांस स्वप्निल आवाडे ,जवाहर साखरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले , जवाहर बँक संचालक विलास गाताडे , मर्चंट बँकेचे चेअरमन जाधवजी पटेल , शशिकांत खवरे , उमेश पाटील , अभयसिंह पाटील, जवाहर बँक संचालक विलास गाताडे , मर्चंट बँकेचे चेअरमन जाधवजी पटेल , शशिकांत खवरे , उमेश पाटील , अभयसिंह पाटील , कामधेनू पतसंस्थेचे सर्व संचालक , सभासद , कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. स्वागत शरद निंबाळकर यांनी केले , तर शेवटी आभार व्हाईस चेअरमन मिलींद इंगळे यांनी आभार मानले .
फोटो
हेरले येथील कामधेनू पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम प्रसंगी खास. राजू शेट्टी बोलतांना शेजारी अन्य मान्यवर.