माजगाव प्रतिनिधी —बाजीराव कदम
संस्कृत सुभाषिताप्रमाण वर्तन करणारी अनेक व्यक्तीमत्व म्हणजे माळवाडी (माजगाव).
शतेषु जयते शुर:सहस्रेषु च पंडीत।
वक्ता दशसहस्रेपु:दाता भवति वा न वा।।
शुरवीर असा मनुष्य शंभरातुन एखादा जन्मतो,विद्वान मनुष्य हजारातुन एखादा जन्मतो.उत्कृष्ठ वक्ता दहा हजारातून एखादा जन्मतो.पण दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच मिळतो.म्हणजे दातृत्व दुर्मिळ असल्याच वास्तव हे सुभाषित मोजक्या शब्दात मांडत.परंतू या सुभाषिताला छेद देणार गाव म्हणजे पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी माळवाडी.
जेमतेम हजारभर लोकवस्तीच हे गाव.आणि ह्या हजारभर लोकांमधुनच जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधांसाठी सढळ हाताने मदत करणारी अनेक व्यक्तीमत्व आपल्याला या गावामध्ये भेटतात.त्यापैकी एक म्हणजे या गावचे भुमिपुत्र तरुण उद्योजक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे श्री.अमर सदाशिव
वडाम (साहेब).आपले वडील कै.डाॅ. सदाशिव धोंडी वडाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हापरिषदेच्या मराठी शाळेतील मुल आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कुठेही कमी पडू नयेत या जाणिवेतून या सामाजिक बांधलकीतुन या शाळेला २५०००₹ चा चेक व Hpकंपनी चा कलर प्रिंटर शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाजीराव शामराव कदम यांच्याकडे भेट म्हणुन सुपुर्द केला.
या प्रसंगी मुख्याध्यापक म्हणाले."आजच्या पिढीमध्ये अशी सामाजिक बांधीलकी जपणारे तरुण उद्योजक आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.त्यांचे हे कार्य म्हणजे आजच्या तरुणांना दिपस्तंभासारखे वाटावे असेच आहे."आभार शाळेचे सहा.शिक्षक मंजीत नागमवाड सर यांनी मानले.