कोल्हापूर /प्रतिनिधी दि. १४/३/१८
मिलींद बारवडे
एकमेकांबद्दल चांगले मत असेल तर कार्य सफल होते. उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापूरे यांना फायलिंगच्या कार्याची संधी दिली त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी होण्याची संधी मिळाल्यास त्या कार्याच्या अनुभवामुळे त्यांना निश्चित यश मिळेल. कोर्ट आदेश, कोर्ट कंटेम आदीसह तांत्रिक बाबी तपासून कार्य केल्यास शिक्षणाधिकारी जबाबदारीच्या पदाचे कार्य सुव्यस्थित होते. असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केले.
ते जिल्हा परिषद माध्यमिक विभाग कोल्हापूरच्या वतीने उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापुरे यांची भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झालेने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या प्रसंगी अध्यक्ष स्थानांवरून बोलत होते.
माध्य.शिक्षणाधिकारी लोहार पुढे म्हणाले की, उपशिक्षणाधिकारी पाश्चापुरेंचे एकच पद असतांना त्यांनी कार्य स्तुत्य केले. जि.प. माध्यमिक शिक्षण विभागात कुटुंबासारखे वातावरण आहे.सर्व विस्तार अधिकारी क्रियाशील अभ्यासू असल्याने काम करण्यास आनंद वाटतो. सात हजार कामाच्या फायलिंग निर्गत केल्या आहेत. तुमच्या एका टिप्पणीमुळे जर एखादयाचे कल्याण होत असेल तर निश्चित सदैव चांगले कार्य करा. या ध्येयाने प्रेरित होऊन सर्वजन आपले कर्तव्य बजावत आहेत. त्याचा मनस्वी आनंद आहे.
सत्कारास उत्तर देतांना उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापुरे म्हणाले की, मी गरिब कुटुंबातून हालाकिच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन या पदापर्यंत पोहचलो आहे. आजही लहान, बालपणकाची प्रेरणा मला मोठी ऊर्जा देत आहे.२७ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात गटशिक्षण अधिकारी पदावर प्रामाणिक कार्य केले. माध्यमिक विभागात ९ महिने कालावधी कर्तव्य बजाविले.सर्वांचे सहकार्य मला लाभले . माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पदभार स्विकारल्यापासून त्यांच्या कार्यसिध्दीने मागील काही वर्षे डागाळलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाला उजाळा देण्याचे त्यांनी बुद्धीचातुर्याने प्रामाणिक कार्य केले आहे. शासनाच्या चक्राकार पध्दतीच्या पदोन्नती नियमांने मला भंडारा जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती मिळाली ती आनंदांने स्विकारली आहे.दोन वर्ष दोन महिने सेवानिवृत्तीस शिल्लक आहेत. आगामी काळात जन्मभूमी कोल्हापूरमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहीन.भंडाऱ्यामध्ये प्रामाणिकपणे कार्य करून कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक भंडारा जिल्ह्यात वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
या प्रसंगी माध्य.शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापूरे यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक आबासाहेब दिंडे यांनी केले.
यावेळी स्वाभिमानी शिक्षक संघ अध्यक्ष सुधाकर निर्मळे,विस्तार अधिकारी आर. व्ही. कांबळे, आनंदराव आकुर्डेकर, बी.डी.टोणपे, शिवाजी मानकर, अधिक्षक प्रकाश नलवडे, अधिक्षक भरत शिंदे, कास्ट्राईब महासचिव राजेंद्र कांबळे,मदन जाधव, अजित कणसे, सुधिर कुंभार, राजू घोटणे,,शिवाजी खटांगळेकर, दा. जी. पाटील, अभिजीत बंडगर, मिलींद गुरव, रविंद्र महाजन, रेखा सावंत, आश्विनी भक्ते, आराधना कांबळे, मंदाकिणी लोंढे, पूनम ठमके, विमल चव्हाण, मनिषा सुर्यवंशी, सुनिल मिसाळ, शिवाजी पोवार, अर्चना निगडे, सुनिल मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
उपशिक्षणाधिकारी एल.एस. पाश्चापूरे यांचा सत्कार माध्य. शिक्षणाधिकारी किरण लोहार करतांना. शेजारी विस्तार अधिकारी शिवाजी मानकर,अधिक्षक प्रकाश नलवडे, आनंदराव आकुर्डेकर
(छाया राजू घोटणे)