हातकणंगले/ प्रतिनिधी :
सलीम खतीब
पत्रकार हा समाज्याचा आरसा आहे. समाज्यात घडत असलेल्या चांगल्या व वाईट घटनाचे माहिती जगासमोर आणुन समाजप्रबोधनाबरोबरच समाज्यात बदल घडविण्याचे काम पत्रकार करीत असतात. हे काम करीत असताना परीसरातील चांगल्या लोकांना पुरस्कार देवुन त्यांना प्रेरणा देण्याचे काम उदगांव अर्जुनवाड पत्रकार संघाने केला आहे. त्याचे हे कार्य गौरवास्पदं असुन, देशाचा चौथा स्तंभ मजबुत करण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. दिनेश बारी यांनी केले.
उदगांव येथे कोल्हापूर डिस्ट्रीक्टं रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संलग्नं उदगांव-अर्जुनवाड पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण व गौरव सोहळा कार्यक्रम संपन्नं झाला. यावेळी डॉ. बारी बोलत होते. अध्यक्षस्थानी वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक सुधाकर निर्मळे होते. प्रारंभी आघ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रजज्वलनं करण्यात आले. स्वागत पत्रकार दगडु माने तर प्रास्ताविक उदगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष इजाजखान पठाण यांनी केले.
यावेळी डॉ. बारी पुढे म्हणाले, पोलिस व पत्रकार नाण्याच्या दोन बाजु आहेत. पुरस्कार व्यक्तीनी या पुरस्काराकडे एक प्रेरणा म्हणुन पाहवे असा, संदेश त्यांनी दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर डिस्ट्रीक्टं रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले, पत्रकार हा समान्यं लोकांचे प्रश्नं सोडविण्यासाठी काम करीत असतात. मात्र त्यांना येत असलेल्या अडचणी त्यांच्या समस्याकडे कोणाचेही लक्ष नसते. यासाठीच कोल्हापुर जिल्हातील पत्रकाराना एकत्र करुन त्याच्या समस्या सोडविण्यसाठी वेलफेअर असोसिएशनची स्थापना केली आहे. उदगांव-अर्जुनवाड पत्रकार संघातील सर्वानीच कौतुकास्पदं कार्य केले आहे. यावेळी जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपाधिक्षक क्रष्णात पिंगळे, जिल्हा परीषद सदस्या स्वाती सासणे, सरपंच सविता ठोमके यांच्यासह मान्यवरानी मार्गदर्शन केले.
दरम्यान, सागर कदम (समाजभुषण), वैघ डॉ. अनंत कुलकर्णी (उक्रष्ठा शिक्षण प्रसारक), प्रथ्वीराज यादव (उक्रष्ठं लोकप्रतिनिधी), सुरेश कांबळे (क्रषी उघोजक), शिलाताई कोळी (हिरकणी), भाग्यश्री केदार (उत्क्रष्ठं प्रशासक प्रतिनिधी), प्रियंका साळुखे (विशेष गौरव), भोजलिंग नरळे (अन्नदाता), सुमित सुतार (उदयन्मुख बालकलाकार) यांना सर्व पुरस्काराने मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार अरुण चौगुले, अजित चौगुले, निनाद मिरजे, राहुल मांगुरकर, संतोष बामणे, संतोष बिडवे, संतोष तारळे, सतिश पाटील, अजित चंपुणावर, रमेश चव्हाण, तात्यासो चौगुले, अनिल चव्हाण, विजय सुर्यवंशी यांच्यासह पत्रकार व मान्यवराचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्यं मन्सुर मुल्लाणी, शिवसेना तालुका प्रमुख सतिश मलमे, नंदु कुलकुर्णी, सुरेश पाटील, उघोजक जालिंदर ठोमके, उपसरपंच फिरोज नदाफ, स्वाती पाटील, भरत वरेकर, बाळासाहेब कोळी, भारती कोळी, मधुकर निकम, रामभाऊ बंडगर, मंगेश घाटगे, नितिन कंदले, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यं, कर्मचारी, ग्रामस्थं मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रंसंचालन शुभम गायकवाड तर आभार संतोष बिडवे यांनी केले.
फोटो – उदगांव येथे पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्तं मान्यवराच्या समवेत डॉ. दिनेश बारी, सुधाकर निर्मळे, क्रष्णात पिंपळे, सतिश मलमे, स्वाती सासणे, मन्सुर मुल्लाणी, सविता ठोमके, स्वाती पाटील यांच्या समवेत मान्यवर उपस्थित होते. (छाया – अजित चौगुले, उदगांव)