कसबा बावडा:
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू संस्कार व्यक्तिमत्व शिबीर चे 1 मे ते 5 मे मोफत आयोजन करण्यात आले आहे.शिबीर चे उदघाटन नगरसेविका माधुरी लाड यांच्या हस्ते व मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,,रमेश सुतार,भारतवीर मित्र मंडळाचे कार्यकर्ते,प्राथमिक शिक्षक समिती चे अध्यक्ष उमेश देसाई,उपाध्यक्ष सुनील पाटील,यांच्या प्रमुख उपस्थिती शिबीर चे उदघाटन झाले प्रसंगी 1 मे ध्वजवंदन जवान सकटे यांच्या हस्ते करण्यात आले.नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेतील शिबीर बद्दल पालक,भागातील विद्यार्थ्यांनी शिबीर चा लाभ घ्यावा असे आवाहन केले.उमेश देसाई यांनी विद्यार्थीनी देशाचा सक्षम असा नागरिक घडवावा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.
भारतवीर मित्र मंडळाचे चेतन चौगले,राजू चौगले,संभाजी कुंभार, प्रमुख उपस्थित होते.
सदर शिबिरात ध्यान धारणा, मनःशांती ,प्राथनेचे महत्व,लेझीम प्रकार ,रिलॅक्ससेशन,व्यायाम,कवायत,रांगोळी,मेहंदी, लेझीम,झान्ज,संगीत,गायन,नृत्य,चित्रकला,हस्तकला,सर्पज्ञान,नियोजन,कार्यानुभव,वाचन, मनन, हास्यकल्लोळ,सूत्रसंचालन,भाषण,
अभिनय आशा विविधहु विषयांचे ज्ञान मुलांना दिले जाणार आहे.
प्रास्ताविक व शिबीर चा उद्देश मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,परिश्रम घेतले.कार्यक्रमचे आभार प्राजक्ता कुलकर्णी यांनी मानले.