सिद्धनेर्ली (वार्ताहर)
रमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते आणि "दुष्काळ आवडे सर्वांना "या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार पी साईनाथ हे कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे कॉम्रेड संतराम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व कॉम्रेड गणपती ईश्वरा पाटील वाढदिवस गौरव समिती यांच्या निमंत्रण वरून येथे आले होते.
भारतातील सद्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर स्वतंत्र डाँक्युमेंटरी करण्याचे त्यांचे काम सुरू असून श्री पाटील यांचीही माहिती ते घेण्यासाठी आलेले असताना सिद्धीनेर्ली पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धीनेर्ली पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय कुरणे ,चंद्रकांत निकम,शिवाजी पाटील,पंडित कोईगडे, विजय पाटील रवींद्र पाटील आदी पत्रकार यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते
फोटो-सिद्धनेर्ली येथिल पत्रकार संघाच्या वतीने पी साईनाथ यांचा सत्कार करताना पंडित कोईगडे,विजय पाटील ,रवींद्र पाटील,शिवाजी पाटील,विजय कुरणे ,चंद्रकांत निकम आदी