सिद्धीनेर्ली (वार्ताहर)
रॅमन मॅगसेसे अवॉर्ड विजेते आणि "दुष्काळ आवडे सर्वांना "या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार पी साईनाथ हे कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे कॉम्रेड संतराम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व कॉम्रेड गणपती ईश्वरा पाटील वाढदिवस गौरव समिती यांच्या निमंत्रण वरून येथे आले होते.
भारतातील सद्या हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर स्वतंत्र डाँक्युमेंटरी करण्याचे त्यांचे काम सुरू असून श्री पाटील यांचीही त्यासाठी त्यांनी माहीती घेतली . त्यांच्याशी पाणी प्रश्न,स्वातंत्र्य चळवळ,सिमा लढा यासह डाव्याचळवळीतील कांही आठवणी यासह विवीध विषयावर चर्चा केली .
ते पुढे म्हणाले सारकारी विद्यापीठे व बियाणे कंपनीच्या सल्ल्यावर शेतक-यांनी अवलंबून राहू नये.त्यापेक्षा स्वतःचे अभ्यास गट तयार करून शेतीतील प्रयोग व अनुभव यांची सांगड घालून स्वतः च तज्ञ व्हावे.व गावोगावी सामुदायिक संशोधन केंद्रे उभारावीत.त्यामुळे निसर्गासह सरकारी कोपामुळे शेतीतील होणारे नुकसान शेतकरी टाळू शकतील .
असमान पाणी वाटप व्यवस्थेवर आसुड ओढताना ते म्हणाले भारत जगातील एकमेव देश आहे जिथे नद्यांचे एकीकडे राष्ट्रीयीकरण तर दुसरीकडे पाण्याचे मात्र विविध अभ्यास प्रयोगांच्या गोंडस नावाखाली खाजगीकरण केले जाते.ग्रामीण भारतातील शेतक-यांच्या हक्काच्या पाण्यावर सरकारी वरदहस्ताने शहरी भारतीय अतिक्रमण करत आहेत .एकीकडे टंचाई ग्रस्त भागात कामाचा खोळंबा करून माता भगीनी पन्नास पैशापासून एक रूपये दराने पाणी पिण्यासाठी विकत घेतात .तर त्याच भागात बियरच्या कारखान्यांसाठी एक पैसा प्रती लिटर दराने तीस वर्षाच्या कराराने सरकार पाणी पुरवित आहे .शिवाय औद्योगिक वापरासाठीही पिण्याच्या व शेतीसाठीच्या वापरातीलच पाणी वळवले जाते.ही विषमता थांबवण्यासाठी आता शेतक-यांनीच पाणीदार होऊन पाणी वाचविले पाहीजे.अन्यथा पाण्यासाठी ग्रामीण भारत व शहरी भारत यांच्यात संघर्ष अटळ आहे.
यावेळी श्री पाटील यांचा साईनाथ यांनी सत्कार केला.तर श्री साईनाथ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नीता पाटील यांनी तर पत्रकार संघाच्या वतीने सकाळचे बातमीदार पंडित कोईगडे,चंद्रकांत निकम, यांच्यासह विजय कुरणे,शिवाजी पाटील ,विजय पाटील ,रवींद्र पाटील आदींनी पुस्तक भेट देऊन केला.यावेळी अजीत पाटील शेखर सावंत यशवंत पाटील सुनिल मगदूम विलास पोवार किसन मेटील सदाशिव निकम शिवाजी मगदूम सुवर्णा तळेकर एम बी पाटील आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.चौकट हतबल मिडीया हताश माणसं लाखोंच्या संख्येने पोटतिडकेने शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात मोर्चे काढतात .शासनकर्ते त्यांची थट्टा हे खरे शेतकरी नाहीत अशी करतात .तर पी टी आय सारखे क्राईमचा प्रतिनिधी या मोर्चाच्या वार्तांकणासाठी पाठवितात .आता शेतीतील गंधही नसणारा काय लिहीणार?असा प्रश्न उपस्थित करून जनताही निमुटपणे हे सारे पाहते.असे सांगत साईनाथ यांनी मिडीया हताश असून जनता हतबल झाली असल्याचे जळजळीत सत्य यावेळी मार्मिक शब्दांत मांडले .
छायाचित्र- सिद्धनेर्ली येथे सामाजीक कार्यकर्ते काँ गणपती पाटील यांचा वयाची शंभरी पार केल्या बद्दल सत्कार करताना ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ