कोल्हापूर शहरातील गोकुळ हॉटेल ते गवत मंडई या मुख्य रस्त्यावरून वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याने गुरुवारी 10 मे रोजी वाहनधारकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मुख्य रस्त्यावर तासनतास खोळंबावे लागल्याने मोठी गैरसोय झाली होती. वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील वाहतुकीची शिस्त न लावली गेल्याने शहरात वाहतुकीचे तीनतेरा झाले आहेत. शाहूपुरी व्यापार पेठ व होलसेल दुकाने असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या वाहनांसह लहान वाहनांचीही मोठी वर्दळ असते. परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून ठिकठिकाणी अवजड वाहने उभी केली जातात. तसेच हातगाड्या, बेशिस्त पार्किंगमुळे या ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण होत असतात.
या रस्त्यावरूनच वाहतूक कोंडी या ठिकाणी नित्याचीच झाली आहे. या ठिकाणावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखी आहे. वाहतूक शाखेने जरी या ठिकाणी एक कर्मचारी कायमस्वरुपी उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.