शिरोली/ प्रतिनिधी : दि. ८/५/१८
अवधूत मुसळे
मौजे वडगांव( ता. हातकणंगले) येथे शिरोली जि.प. मतदार संघ अंतर्गत जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी विविध विकास कामांचा ३९ लाख रुपयांच्या निधीचा शुभारंभ पं.स. सदस्य उत्तम सावंत यांच्या समवेत केला.
मौजे वडगांवमध्ये विरोधी पक्षनेते अविनाश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक यांच्या फंडातून प्रभाग क्रं.४ नवीन वसाहत येथे गल्ली क्रं. ०२ अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, प्रभाग क्रं.१ दलित वस्ती सुधारण योजने अंतर्गत चर्मकार समाज गल्ली खडीकरण व डांबरीकरण ५ लाख, प्रभाग क्रं.२ देखभाल दुरूस्ती अंतर्गत गावातील पाणी पुरवठा योजना दुरुस्त करणे ७ लाख, प्रभाग क्रं.३ जनसुविधा अतंर्गत सार्वजनिक स्मशानभूमी सुधारणा करणे ५ लाख अशी २२ लाखांची विकास निधीतून कामांची सुरूवात झाली आहे.
तसेच इजिमा क्रं.१९२ हेरले, मौजे वडगांव , तासगांव रस्ता दुरुस्ती करणे १७ लाखासह असा जवळपास ३९ लाख निधीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सरपंच काशिनाथ कांबळे, भाजपा तालूका उपाध्यक्ष विरोधी पक्ष नेता अविनाश पाटील, आनंदा थोरवत, ग्रां.पं सदस्य,अवधूत मुसळे, सुभाष अकीवाटे, स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे, ग्रां. पं. सदस्या सुनिता मगदूम, सरिता यादव, सरताज बारगीर, माधुरी सावंत, मायावती तराळ, अश्विनी लोंढे, माजी सरपंच यासीन मुलाणी, चेअरमन अॅड.विजय चौगुले, मोहन शेटे, माजी चेअरमन अमीरहमजा हजारी, डॉ. अमीर हजारी, रंगराव कांबरे, महावीर शेटे,बाबगोंडा पाटील, मधुकर अकिवाटे,उपस्थित होते, स्वागत अविनाश पाटील यांनी तर आभार भाजपा शाखाप्रमुख प्रदिप लोहार यांनी मानले.
फोटो कॅप्शन
मौजे वडगांव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करतांना जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक, पं.स. सदस्य उत्तम सावंत, अविनाश पाटील आदीसह अन्य मान्यवर.