प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
फास्टॅग हा आरएफआयडी टॅग असून बँकांच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही सेवा उपलब्ध आहे. याचा वाहनचालकांना वेळ आणि इंधन बचतीसाठी फायदा होणार आहे.फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक 'इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली' आहे. भारतात डिसेंबर २०१७ पासून पुढे विकल्या जाणाऱ्या सर्व नव्या गाड्यांना फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे, विना-रोख(कॅशलेस) पद्धतीने लवकर टोल जमा होईल व टोल प्लाझांवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. याने वाहनांच्या वाहतुकीचा वेळ कमी होतो व त्याचा फायदा होतो.
फास्टॅगमध्ये रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन आरएफआयडी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. याद्वारे, प्रीपेड किंवा संबंधित बचत खात्यातून टोलची रक्कम भरली जाऊ शकते. हे गाडीच्या पुढील काचेवर बसविले जाते आणि अशा गाडीला टोलनाक्यावर थांबणे आवश्यक नाही.
प्रत्यक्षात टोल नाक्यांवर आलेल्या वाहनांच्या तुलनेत कमी संख्या दाखवणे, काही वाहनांना टोलमधून सवलत देणे आदी कारणांमुळे शासनाचा महसूल बुडत होता. त्यामुळे ‘फास्टॅग’ प्रणाली कार्यान्वित झाली. टोलवसुलीतून होणाऱ्या प्रचंड भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक वाहनधारकांने फास्टॅगच वापरावा.
‘फास्टॅग’ धारकांसाठी असणाऱ्या राखीव लेनमध्ये अन्य वाहने आल्यास संबंधितांकडून दुप्पट शुल्क आकारणी घेण्याचा नियम आहे.
सध्या कित्येक टोलची वसुली पुर्ण झाली आहे तरीही कमी वसुली दाखवून मुदत वाढवून दिली जात आहे तेव्हा असे टोल नाके बंद होण्यासाठी प्रत्येकाने फास्टॅग चा वापर करून भ्रष्टाचार रोखायला हवा.