कसबा बावडा: ज्ञानराज पाटील
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाहू संस्कार व्यक्तिमत्व शिबीर चे 1 मे ते 5 मे मोफत आयोजन करण्यात आले होते.शिबीराचा सांगता समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी मा. एस.के.यादव साहेब यांच्या हस्ते व शैक्षणिक पर्यवेक्षक मा.विजय माळी सर, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस मनोहर सरगर,उपाध्यक्ष दिलीप माने,सभापती संजय पाटील,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर सर,उमेश देसाई, सुनील पाटील,राजेंद्र पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,रमेश सुतार,भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन चौगले, राजू चौगले,स्वप्नील चौगले, प्राथमिक शिक्षक समिती चे अध्यक्ष उमेश देसाई,उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचे बक्षीस वितरण व शिबीर सांगता समारंभ पार पडला.
प्रशासनाधिकारी मा.यादव साहेब यांनी सदर शिबीर उपक्रमाचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना खरे शिक्षण यातून प्राप्त होते असे उपक्रम शाळा शाळातून राबवले गेले पाहिजेत यातून नक्कीच देशाचा सक्षम असा नागरिक घडेल असे गौरव उदगार काढून शिबिराचे अभिनंदन केले.
शिबीरातील मुलांना शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील गणबावले,प्रमोद गायकवाड,सुशील जाधव,शिवाजी तरुण मंडळ,शिवाजी पेठचे सामाजिक कार्यकर्ते हर्षल माने,विजय शिंदे,राकेश शिंदे,मनोहर सरगर,दिलीप माने,वेध फाऊंडेशनचे रुद्र पाटील, प्रा,दीपक उलपे,यांनी वही, बिस्किटे,केळे वाटप केले.
या शिबिरात योगासने व सूर्यनमस्कार उत्तम कुंभार,प्रार्थना श्लोक प्राजक्ता कुलकर्णी मॅडम,रांगोळी रंगसंगती व मार्गदर्शन प्राजक्ता शिंदे,सर्प विषयक माहिती राजेंद्र पाटील,प्रभावी सूत्रसंचालन आर.जी.कांबळे,इंग्लिश स्पेक्किंग जयश्री पुजारी मॅडम, कागदकाम कोलाज द्वारकानाथ भोसले , एरोबिक्स प्रकार स्वाती लंगडे,सुजाता आवटी,पुस्तक वाचन व मनन प्रदीप पाटील,मराठी शुद्धलेखन अजितकुमार पाटील, लाठी काठी सह्याद्री प्रतिष्ठन चे शुभम कोळी,लेझीम उमेश देसाई ,अभिनय गीत मोरे मॅडम,हालगीवादन हेमंतकुमार पाटोळे इत्यादी मार्गदर्शकांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात ध्यान धारणा, मनःशांती ,प्राथनेचे महत्व,लेझीम प्रकार ,रिलॅक्ससेशन,व्यायाम,कवायत,फुटबॉल,रांगोळी, लेझीम,संगीत,गायन,नृत्य,चित्रकला,हस्तकला,सर्पज्ञान,नियोजन,कार्यानुभव,वाचन, मनन, हास्यकल्लोळ,सूत्रसंचालन,भाषण,
अभिनय अशा विविध विषयांचे ज्ञान मुलांना देणेत आले.
प्रास्ताविक व शिबीर चा उद्देश मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,परिश्रम घेतले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे, आभार जे.बी. सपाटे यांनी मानले.