हातकणंगले/ प्रतिनिधी
सलीम खतीब
हेरले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली आहे. या मंडळाचा सर्वसामान्य खेळाडू अस्लम खतीब पोलीस अधिकारी पदी पोहचले यातून मंडळाचा लौकीक दिसून येतो. असे मत आम.डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केले.ते हेरले (ता.हातकणंगले) येथे हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित प्रो कब्बड्डी धर्तीवर मॅटवरील निमंत्रित कब्बड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रास्ताविक गणी देसाई यांनी केले.
आम.डॉ. मिणचेकर पुढे म्हणाले की,१९७६ साली या मंडळाची स्थापना झाली असून गेली ४२ वर्षे कब्बड्डीची परंपरा जपली आहे. तरूणाईस शरीर संपदा देण्याचे कार्य मंडळाने केले आहे.अनेक खेळाडूं राष्ट्रीय, राज्यस्तरावर खेळल्यांना त्यांना शासकिय नोकरीची संधीही प्राप्त झाली असल्याने मंडळाचे कार्य गौरवास्पद आहे.युवकांनी जास्तीत जास्त खेळास महत्त्व द्यावे व शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
आम.डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते रोपास पाणी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते नवभारत शिरोली विरूध्द डायनॅमिक झ्चलकरंजी यांच्या पहिला सामन्याचे नाणेफेक उडवून सुरूवात करण्यात आली. यावेळी डॉ. पद्माराणी पाटील, शाहीर कुंतिनाथ करके यांनी मनोगते व्यक्त केले.पंचप्रमुख कुबेर पाटील, मनोज मगदूम, संतोष घाडगे, अमर नवाळे, अभिजीत पाटणे, उत्तम नलवडे, कमरूद्दीन देसाई, सागर लंबे आदी पंच म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील २५ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत.
हेरले क्रीडा मंडळ विरूद्ध सह्याद्री कोल्हापूर सामना समान गुणावर सुटला. तरूण भारत सांगलीने शिवप्रेमी शिरोलीवर विजय मिळविला,छावा शिरोलीने जयशिवराय हेरलेवर विजय मिळविला, शिवशाहू सडोलीने भादोले क्रीडा मंडळावर विजय मिळविला, नवभारत शिरोलीने मावळा सडोलीवर विजय मिळविला, किणी विद्यार्थी मंडळाने डायनॅमिक इचलकरंजीवर विजय मिळविला. पहिल्या दिवशी सहा सामने अटीतटीचे झाले.
या प्रसंगी शाहीर कुंतिनाथ करके, वेदांतिका माने. जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, सपोनि अस्लम खतीब, सुधाकर निर्मळे, राजू मोरे,उपसरपंच विजय भोसले, निलोफर खतीब, केशव मिरजे, कपिल भोसले, संदीप शेटे,राहूल शेटे, अमित पाटील, विनोद वड्ड, उत्तम माळी, भरत कराळे, बाबासाहेब कोळेकर, प्रकाश खुपिरे, रिजवाना पेंढारी, प्रा. भाऊसाहेब वड्ड, सलीम खतीब,रणजित इनामदार, जयकुमार करके, नारायण कटकोळे आदी मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
हेरले ( ता. हातकणंगले ) येथे मॅटवरील कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी संघासोबत आम.डॉ. सुजित मिणचेकर, शाहीर कुंतिनाथ करके,वेदांतिका माने, जि.प. सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व इतर मान्यवर