हेरले / प्रतिनिधी दि. २७/४/१८
भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या विविध योजनांचा सर्व सामान्य नागरिकानी लाभ घ्यावा . असे आवाहन भाजपचे पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांनी केले. ते मौजे वडगाव ता.हातकणंगले येथे जय मल्हार गँस एजन्सीच्या वतीने आयोजित उज्वला गँस वाटप कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ कांबळे होते. तर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पी.डी.पाटील व समता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कौंदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावंत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व सामान्य लोकांना घरगुती वापरासाठी गँस मिळावा म्हणून उज्वला गँस हि महत्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेमुळे गोर गरीब लोकांच्या घरा घरात मोफत गँस कनेक्शन देण्यात येत आहेत. यासह अनेक योजना कार्यान्वित आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
पी.डी.पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सबका साथ सबका विकास ' हा ऐकमेव उद्देश ठेवून केंद्र व राज्य सरकारने सर्वच क्षेत्रात अनेक लोकाभिमुख योजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून उज्वला गँस हि योजना आहे. यामुळे मागासवर्गीय, भूमिहीन, शेतमजूर, दारीद्रय रेषेखालील नागरिक या सर्वांना मोफत गँस कनेक्शन जोडणेत येत आहेत. याची संपूर्ण रक्कम केंद्र सरकार स्वतः भरत आहे. तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
तालुका अनुसूचित जाती उपाध्यक्ष भूपाल कांबळे यांनी मौजे वडगाव या गावात या योजनेचे साडे चारशे कनेक्शन तर एकूण साडे सहाशे कनेक्शन आहेत. येत्या काही दिवसांत गावातील वंचित लोकांना गँस देवून संपूर्ण गाव गँस ग्राम करणार असल्याचे सांगितले.
जय मल्हार गँसचे प्रकाश कौंदाडे यांनी शिरोली, नागाव, टोप, मौजे वडगाव, हालोंडी, हेरले, माले, मुडशिंगी आदी गावासह सुमारे दीड हजार उज्वला गँस कनेक्शन जोडली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास सागर कौंदाडे, सौ. रूपाली कांबळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
मौजे वडगांव येथे गॅस कनेक्शन वितरीत करतांना पं.स. सदस्य उत्तम सावंत, पी.डी. पाटील, प्रकाश कौदांडे, भुपाल कांबळे आदी मान्यवर.