कोल्हापूर/ प्रतिनिधी
मिलींद बारवडे
शासनाने तांदळाची रिकामी पोती विकून पैसा जमवण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून या विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी.पाटील यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची सभा प्रिन्स शिवाजी बोर्डिंग मध्ये पार पडली.अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
डी.बी.पाटील पुढे म्हणाले, एका बाजूला शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांना मुक्त केले असताना रिकामे पोते बारदान जमाखर्चामध्ये मुख्याध्यापकांना गोवण्याचा हेतू काय? यासाठी एकत्रित येवून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी सरल मध्ये विद्यार्थी माहिती एकत्रित असताना समग्र शिक्षा अभियान मध्ये पुन्हा नव्याने माहिती संकलित करण्याची गरज नसल्याचे सांगितले.विनाअनुदानितचे नेते खंडेराव जगदाळे यांनी १ जून पर्यंत विनाअनुदानित शाळांबाबत शासनाच्या भूमिकेची वाट पाहिली जाईल, त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.कोल्हापुर विभागाचे अध्यक्ष आर.वाय.पाटील यांनी कर्मचारी यांच्या वरिष्ठ श्रेणीसाठी शाळेला ए ग्रेड सक्ती चुकीची असल्याचे सांगून कर्मचारी यांच्यावर यामुळे अन्याय होणार असल्याचे सांगितले.
एस.के.पाटील यांनी ७ व्या वेतन आयोगामधील मुख्याध्यापकांच्या त्रुटी दुरुस्तीसाठी बक्षी समितीसमोर भूमिका मांडावी असे स्पष्ट केले. बी.एल.ओ.प्रश्नाबाबत डी.एस.घुगरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी केली.यावेळी जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अनेक अडचणीवर चर्चा झाली.
यावेळी के.बी.पोवार, के.के.पाटील, बी.जी.बोराडे, बी.जी.कुदळे, ए.आर.पाटील, व्ही.के.पगरे, डी.एस.जाधव, एस.एम.पाटील, डी.पी.कदम, वाय.व्ही.कांबळे, जे.एम.पोवार उपस्थित होते. सभेचे स्वागत एस.के.पाटील यांनी केले, तर आभार डी.एस.घुगरे यांनी मानले.
फोटो
कोल्हापुर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत बोलताना डि.बी.पाटील,व्ही.जी.पोवार, आर.वाय.पाटील.व अन्य मुख्याध्यापक वृंद
1 comments:
Write commentsएकदम बरोबर
Reply