कोल्हापूर/ प्रतिनिधी दि. ६/५/१८
मिलींद बारवडे
छात्र सैनिकांना अधिकाधिक सैन्यदलाचे ज्ञान देण्यासाठी पाच महाराष्ट्र बटालियनसह एनसीसी अधिकाऱ्यांनी क्रीयाशील राहणे गरजेचे आहे. तसेच भारत सरकारच्या स्वच्छता अभियानास मोठ्या प्रमाणात छात्र सैनिकांच्या मदतीने हातभार लावून ऐतिहासिक स्थळे, शैक्षणिक विभाग , पुतळे परिसरासह सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून स्वछ भारत बनविण्यास अग्रभागी राहूया. असे मत कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के.तिम्मापूर यांनी व्यक्त केले.
ते पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने आयोजित सभा प्रसंगी बोलत होते. यावेळी कोल्हापूर, रत्नागिरी , सिंधुदूर्ग आदी जिह्यातील एनसीसी अधिकारी उपस्थित होते.
कर्नल तिम्मापूर मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, ज्युनिअर सिनिअर डिवीजनच्या छात्र सैनिकांच्या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करून यामधून अधिकाधिक सैन्यदलाचे ज्ञान देण्यासाठी संयोजन केले जात आहे. तसेच विदयार्थ्यांची भरती प्रक्रिया, त्यांना संचलन प्रशिक्षण, एनसीसी थेरी माहिती, विविध कँम्पची माहिती, विविध खेळ, प्रजासत्ताक संचलन निवड प्रक्रिया, स्वच्छता अभियान, विविध प्रबोधनपर रॅली आदींची माहिती देऊन ही कार्ये उत्तम रित्या वर्षभर करून , विविध उपक्रम राबवून सर्वगुण संपन्न छात्र सैनिक बनविण्यासाठी सर्वांनीच उत्तम कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी अॅडम ऑफिसर मेजर विश्वनाथ कांबळीमठ, सुभेदार मेजर मानिक थोरात, सुभेदार शिवाजी सुपनेकर, हरी गावडे, राजाराम पाटील, श्रीधर पोतदार आदीसह एनसीसी अधिकारी उपस्थित होते.
फोटो
पाच महाराष्ट्र एनसीसी बटालीयनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर बोलतांना