सैनिक टाकळी ( प्रतिनिधी)
सेेैनिक टाकळी येथिल सोल्जर स्पोर्टस क्लब च्या वतीने भरवणेत आलेल्या भव्य खुल्या फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेत छत्रपती स्पोर्टस क्लब ने अजिंक्य पद पटकावले. या स्पर्धेमध्ये एकुण ३० संघानी सहभाग नोंदवला होता. उपांत्यपूर्व सामना बोलवाड टाकळी स्पोर्टस व आर . बॉईज रेंदाळ तसेच छत्रपती ग्रुप कोल्हापुर व मिरज स्पोर्टस यांच्या मध्ये झाले या मध्ये छत्रपती ग्रुप व आर बॉईज यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत उपांत्य फेरी गाठली होती .
अंतिम सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आर बॉ ईज संघाने ५ षटकात केवळ २९ धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवले होते .छत्रपती ग्रुपने ही धाव संख्या ३ गड्याच्या मोबदल्यामध्ये सहज पार करत विरजवान चषक पटकावला. या सामन्यासाठी शिवतेज पाटील व नारायण पाटील यांनी पंच म्हणुन काम पाहिले . मालिकावीर म्हणुन आर बॉइजचे शरिफ . सामनावीर छत्रपतीं ग्रुपचे मनोज तर सर्वोत्तम गोलंदाज मिरज स्पोर्टस चे सोहेल यांची निवड झाली. विजयी संघानां उपसरपंच रणजीत पाटील मेघराज पाटील . संजय पाटील .सुधीर पाटील महेश पाटील श्रीधर भोसले।आनंदराव पाटील . सुनील कोष्टी . रविकांत पाटील. भरत जाधव बजरंग पाटील. सचिन पाटील. या मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले .