हातकणंगले/ प्रतिनिधी दि. १/६/१८
सलीम खतीब
बँडमिंटन पट्टू प्रेरणा शिवाजी आळवेकर हिची आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
बालेवाडी पुणे येथे झालेल्या आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत पार्वती हायस्कुल वडगणेची बँडमिंटन खेळाडू प्रेरणा शिवाजी आळवेकर हिची आशियाई बँडमिंटन स्पर्धेसाठी अंडर एटीन इंटर स्कुल भारतीय संघात निवड झाली.यापुर्वी तिने इंटरनॅशनल स्कुल बँडमिंटन स्पर्धेत भारतीय संघातून खेळताना चौथा क्रमांक मिळवला होता.ती सध्या दहावी मध्ये शिकत आहे.तिला प्रशिक्षक तिमिर आरवारे सांगली,केदार नाडगोंडे,तन्मय करमरकर,अक्षय मनवाडकर,महेश जाधव,अनिल जाधव या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या बहुमोल आर्थिक सहकार्याने प्रेरणाने यश मिळवले आहे.आजपर्यंत प्रेरणाने आपली बहीण ऋचा आळवेकर व श्रुती साखळकर यांच्यासमवेत महाराष्ट्र संघातून खेळताना सुवर्णपदक मिळवले आहे.तसेच प्रेरणाने वैयक्तिक कास्यपदक मिळवले आहे.इंटर स्कुल स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे.भारतीय मुलींमध्ये तिची रँक पाचवी आहे.आज ती उदयोन्मुख खेळाडूसाठी नावाप्रमाणेच प्रेरणा ठरली आहे.तसेच कोल्हापूरची खेळाडू दाक्षायणी पाटील हिने अंडर टेन मध्ये बँडमिंटन स्पर्धेत आंतरजिल्हा अकरा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
आज प्रेरणा व ऋचा या आळवेकर भगिनींची प्रेरणा घेऊन आज कोल्हापूरमध्ये दाक्षायणी पाटील,तन्मय कोरगांवकर,भार्गव कारीकर,आर्यन पंडीत,आर्यन चौगुले,करणसिंह पाटील,विराज थोरात,अक्षय शेळके तसेच श्रुती साखळकर,समृद्धी पोवार इ.खेळाडू कसून सराव करत आहेत.बँडमिंटन असोशियन कोल्हापूरचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.