Wednesday, 6 June 2018

mh9 NEWS

मौ. वडगांव शिवसेनेच्या शहर प्रमुख सुरेश कांबरे यांचा गेल इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

हेरले / प्रतिनिधी दि. ५/६/१८


   गेल इंडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने ग्रामसभेच्या ठरावा नुसार गाव ते आयपी स्टेशन रस्ता, शाळेचे कंपाऊंड, ग्रामपंचायतचा वरचा मजला आदी कामे केले नंतरच गॅस पाईप उचलणेत यावी. ही कामे कंपनीने न केलेस पाईप उचण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असे लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना मौजे वडगांव शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे यांनी दिले आहे.

      लेखी निवेदनातील आशय असा की,मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथे गेल इंडिया कंपनीचे सब स्टेशन असून त्यांना लागणाऱ्या गॅस पाईपचा गट नं. ५१२मध्ये साठा करून ठेवलेला आहे. सदरच्या गॅस पाईप नेणेसाठी गेल इंडिया कंपनीचे अधिकारी व कर्मचारी येऊन क्रेन व कंटेनरच्या साह्याने पाईप नेणेचा प्रयत्न केला होता. परंतू ग्रामपंचायत व गेल इंडिया कंपनीचे अधिकारी यांच्याबरोबर केलेल्या चर्चेमध्ये व दिलेल्या ठरावामध्ये रस्ता व अन्य विकासकामे करणेचे ठरले होते.परंतू गेल्या ८ वर्षात कोणत्याही कामाची ठोस अशी पूर्तता केली नसल्यामुळे गावातील लोक एकत्र येऊन पाईप उचलू न देता कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले होते.

             तसेच सदरची पाईप न उचलणे बाबत दि. ८ मे२०१७ रोजी ग्रामसभेमध्ये एकमताने ठराव मंजूर केला होता. परंतू ग्रामसभेच्या ठरावाचे गावातील काही स्वयंमघोषीत कारभारी व ठराविक ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वैयक्तिक लाभा पोटी व ढपला पाडण्याच्या वृत्तीने दि. ८ मे२०१७ . च्या ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन करून ग्रामपंचायच्या लेटरहेड वरती तसेच ग्रामपंचायतीच्या कोणत्याही प्रोसेडिंग वहीमध्ये व दप्तरी नोंद न करता व काही सदस्यांचा विरोध असतांना वरचे वर दि. २१ मे२o१८ रोजी पाईप नेणस हरकत नसलेबाबतचा दाखला कंपनीला दिला आहे. त्यामुळे सदर दि. ८ मे२o१७च्या ग्रामसभेच्या ठरावाचे उल्लंघन केले असून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेत यावी. सदर पाईप नेणेसाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरिक एकत्र आल्यास वादावादी होऊन उद्रेक होण्याची शक्यता आहे.

      त्यामुळे सदरची पाईप  रस्ता व अन्य व विकासकामे झाले शिवाय उचलणेत येऊ नयेत सदरची गॅस पाईप जबरदस्तीने अथवा बळाचा वापर करून उचलल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसे झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. त्यामुळे सदरची गॅस पाईप रस्ता व अन्य विकासकामे झाले शिवाय प्रशासनाने परवानगी देऊ नये अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी माहिती प्रसिद्धीस शिवसेना शहर प्रमुख सुरेश कांबरे यांनी दिली.

    लेखी निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख , सपोनि एमआयडीसी शिरोली पोलीस ठाणे, व्यवस्थापक गेल इंडिया. प्रा.लि. यांना देण्यात आल्या आहेत.

        फोटो 

मौजे वडगांव शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख सुरेश कांबरे गेल इंडिया कंपनीच्या विरोधातील लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना देतांना शेजारी शेतकरी.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :