Wednesday 6 June 2018

mh9 NEWS

दिपक शेटे सरांची गणित लॅब - अवघड गणिताला आकर्षक आणि सोपे बनवण्यासाठी योगदान

प्रतिनिधी सतिश लोहार      

  

नागाव ( ता. हातकणंगले ) कोल्हापूर  गणितासारख्या अवघड विषयात विविध युक्त्या वापरून विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने गणिताची आवड निर्माण करणारे अवलिया म्हणूनच *श्री दिपक शेटे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. सद्या ते आपल्या " गणित लॅब " मुळे चर्चेत आहेत. *


गणितीय वस्तूंचा मोठा संग्रह त्यांनी आपल्या घरी केला आहे. यामध्ये गणिताशी निगडित विविध मोजमापे, दिडशे वर्षाचे पितळी कॅलेंडर, विविध नाणी, दिशादर्शके, द्रव - धातू यांची अती सुक्ष्म मोजमापे, सॅडो घड्याळ, घटिका, अभियांत्रिकी महाविद्यालय फार पुर्वी वापरली जाणारी विविध उपकरणे याचा मोठा साठा त्यांनी गोळा केला आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरुन त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि पैसा खर्च केला आहे. व्यक्तीला विविध छंद असतात. पण गणिताचा छंद जोपासणारे दुर्मिळ आहेत. 


नागाव  ( ता. हातकणंगले ) या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. संख्याशास्त्र या विषयात मास्टर ऑफ सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बी. एड. करुन एका खासगी शिक्षण संस्थेत ते गणित आणि विज्ञानचे शिक्षक म्हणून गेली अठरा वर्षे कार्यरत आहेत. हे करत असताना त्यांचे शिक्षणही सुरू आहे. डिप्लोमा इन काॅम्प्यूटर प्रोग्रॅमिंग आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट करुन आता ते एमए एज्युकेशन करत आहेत. 

गणिताशिवाय एकही दिवस जगणे हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी अशक्य आहे. असे असताना विद्यार्थ्यांना सर्वात अवघड असणारा विषय म्हणजे गणित. असे का ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिपक शेटे यांनी केला. विशेष म्हणजे याचे उत्तरही त्यांना गणितातच मिळाले. विद्यार्थ्यांना विविध गणितीय उपक्रमातून गणिताची गोडी लावली. यासाठी त्यांनी ' किल्ली भुमितीची ' आणि ' जीवनातील गणित ' या स्वलीखित नाटकांवर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायला लावले. अंकवेल, गणितीय नियम व सूत्रे आणि गणित कोष ही त्यांची गणिता विषयी आवड निर्माण करणारी पुस्तके विद्यार्थ्यांनप्रमाणे पालकांनाही आकर्षित केल्याशिवाय रहात नाहीत. त्यामुळेच दिपक शेटे हे गणित जगतात आणि जगवतात असे म्हटले जाते. गणिताची महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठी लॅब करण्याचा त्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. हे त्यांना आणि त्यांच्या गणित लॅबला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर लक्षात येते. *महाराष्ट्रात जुन्या मापनाची सर्वोत्तम लॅब करण्याचा मानस आहे . लॅब करण्यासाठी माझे कुटुंब व मित्रपरिवार चे सहकार्य लाभले असे आपल्या मनोगतात  श्री दिपक शेटे यांनी व्यक्त केले. 

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :