हेरले / प्रतिनिधी दि. १८ /६/१८
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी छात्र सैनिकांनी योगासनाची प्रात्यक्षिके करून जागतिक योगदिन मोठया उत्साहात साजरा केला.
एनसीसी भवनमध्ये पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा वार्षिक प्रशिक्षण शिबीर सुरू आहे.यामध्ये ज्युनिअर, सिनिअर डिवीजन व विग्जचे ४५० मुले मुली सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छात्र सैनिकांना यागाचे ज्ञान होण्यासाठी त्यांच्या समवेत एनसीसी अधिकारी वर्गांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करीत योगासने सादर केली.
यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल आर.के. तिम्मापूर यांच्या नेतृत्वाखाली शिबीरातील कार्यवाही झाली. अॅडम ऑफिसर मेजर विश्वनाथ कांबळीमठ एनसीसी अधिकारी , अॅन्थोंनी डिसोजा, राजेंद्र बनसोडे, वर्षा मस्के, प्रशांत पाटील, सुभेदार मेजर माणिक थोरात, ट्रेनिंग जेसिओ शिवाजी सुपणेकर, सुभेदार अशोक भांबुरडे, बीएचएम बाजीराव माने, सुभेदार हरी गावडे, राजाराम पाटील, सुभाष आढाव आदी अधिकारी वर्ग प्रशिक्षणात सहभागी होता. अशी माहिती प्रसिध्दीस कर्नल आर.के. तिम्मापूर यांनी दिली आहे.
फोटो
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीरामध्ये छात्र सैनिक योगाची प्रात्यक्षिके करतांना.