माजगाव वार्ताहर:—दि.२१/६/२०१८
कन्या विद्या मंदीर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर शाळेमध्ये २१जून योगा दिवस उत्साहात साजरा करणेत आला.योगा करणेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी,गावचे सरपंच आदरणिय श्री.प्रकाश जाधव साहेब,गावचे निवृत्त पी.एस.आय. अधिकारी श्री.शंकर पाटील साहेब,गावचे नागरीक,पालक,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री.रामराव चेचर साहेब,शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस.चौगले सर,अध्यापक श्री.काशिराम जाधव सर,श्री.गणपती मांडवकर सर,श्री.नामदेव पोवार सर,श्री.प्रकाश पोवार सर,श्री.बाजीराव कदम सर,श्री.कोरे सर उपस्थित होते.
भावी आयुष्यात हाॅस्पिटलचा खर्च कमी करायचा असेल तर योगा करण्याशिवाय पर्याय नाही.निरोगी शरिरातच निरोगी मन वास करते.तसेच देशाची भावी पिढी सशक्त आणि निरोगी बनवायची असेल तर,योगा करण्याशिवाय पर्याय नाही.असे मत श्री.शंकर पाटील साहेब यांनी मांडले.
सरपंच श्री.प्रकाश जाधव साहेब यांनी श्री शंकर पाटील साहेब यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस.चौगले सर यांनी आभार मानले.