हेरले / प्रतिनिधी दि. ५/६/१८
पंचगंगा ही आमची जीवन दायिनी होती पण मानवी चुका मुळे आज ती नदी विषकन्या झाली आहे. शासनाने शहरी जनतेच्या आरोग्याबरोबर ग्रामीण भागच्या जनतेच्या आरोग्यबाबत निर्णय घ्यावा शासनाला जाग आणण्यासाठी ग्रामीण जनतेचे आरोग्य जपण्यासाठी पंचगंगा बचाव कृती समितीचे समन्यवक धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली जनतेने सहभागी व्हावे, भविष्यात रस्त्यावरची लढाईसाठी सज्ज राहावे असे आवाहन माजी खासदार निवेदीता माने यांनी केले.हेरले ता हातकणंगले येथे उपोषण दरम्यान त्या बोलत होत्या. पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने १ जून पासून सुरु झालेल्या या लढयाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नदीकाठच्या गावामधे साखळी उपोषणाद्वारे शासनाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थ एकवटले जात आहेत.हेरले येथील ग्रामस्थ,सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी आंदोलनास प्रतिसाद दिला.
यावेळी माजी जिप सदस्य बबलु मकानदार,रुकडी सरपंच रफीक कलावंत,अमोलदत्त कुलकर्णी ,अमोल मोहीते ,ग्रामपंचायत सदस्या निलोफर इब्राहीम खतीब, रिजवाना पेंढारी , ग्राम.सदस्य रणजीत इनामदार,सतीश काशिद,राहुल शेटे,गंगाराम आवळे,सामाजीक कार्यकर्त्या निलोफर अझरुद्दीन खतीब ,शरद निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
साखळी उपोषण प्रसंगी अनिल बागडी,राजु कचरे,विनोद वड्ड ,इब्राहीम खतीब,,राजु चौगले ,अकबर मुजावर ,आप्पासाहेब थोरवत यांचेसह ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
फ़ोटो
हेरले येथे पंचगंगा प्रदूषणमुक्ति प्रसंगी माजी खासदार निवेदीता माने तसेच साखळी उपोषणास बसलेले ग्रामस्थ व महिला.