हातकणंगले/ प्रतिनिधी
सलीम खतीब
रत्नागिरी-सांगोला महामार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामातंर्गत शेतजमिनीची मोजणीचे काम हेरले व मौजे वडगांव शेतकऱ्यांनी बंद पाडले.
यावेळी ग्रामपंचायतीमध्ये माजी सभापती राजेश पाटील व शेतकरी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. 30 मे रोजी भूमी संपादन अधिग्रहनसाठी अधिकारी शेतजमिन मोजणीसाठी लव्याजम्यासह आले होते. त्यांना लोकशाहीच्या मार्गाने या मोजणीला विरोध करत,शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत कळाव्यात म्हणून,या मार्गाला शेतकऱ्यांच्या विरोध असल्याचे निवेदन भूमिअभिलेख अधिकारी अमोल क्षीरसागर व भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग कोल्हापूर प्राधिकरण अधिकारी आर. डी .काटकर यांना माजी सभापती राजेश पाटील उपसरपंच विजय भोसले ,व मौजे वडगांव सरपंच काशिनाथ कांबळे, अॅड. विजय चौगुले, रावसाहेब चौगुले शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी राजेश पाटील म्हणाले, नागाव टोप पासून राष्ट्रीय महामार्ग क्र ४ हा अवघ्या काही किलोमीटर च्या अंतरावर असून या ठिकाणी चोकाक जवळ हा महामार्ग जोडला जाणार आहे.तेथून शिरोली सांगली फाटा हे अंतर थोड्या प्रमाणात असून महामार्गाच्या माध्यमातून राज्य शासन जाणीव पूर्वक शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणण्याचे प्रयत्न करत आहे.म्हणून या मार्गाला तीव्र विरोध असल्याचे संघितले.कोणत्याही परिस्थित हा महामार्ग होऊ देणार नाही यासाठी शासनाने याचा गाभीर्याने विचार करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला.
हेरले येथील गटनंबर१५७७क,१५५९,१५६०,१५६४,१५६३,१८६२,१८६३,१८६१,१८६०,१८६७,१८७१,१८७२,१८७०,१८६८,१८६९,३९३,३९४,३९९,४००,३९०,४०१,५९,६३,६६,६७,६९,७३,७४,७२ व ७१ या गट नंबर मधील शेती प्रस्थापित असल्याचे समजते.अल्प भूधारक शेतकरी या शेतीवर अवलंबून आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे चरितार्थ ह्या शेतीवर अवलंबून आहे.ही शेती ह्या महामार्गा मध्ये अधिग्रहण करण्यात आली तर येथील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहचे साधन नष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंब उघड़यावर पडण्याची भीती निर्माण होत आहे.
मौजे वडगावमधील गट नंबर २२ मधील ८५७ गुंठ्यांची बागायती शेतीची मोजणीची नोटीस २६ मे रोजी १०० शेतकऱ्यांना तात्काळ देऊन २८ मे रोजी रूकडीचे भूमिअभिलेख अधिकारी सोनबा निगडे सहकाऱ्यासह मोजणीस आले होते. तेंव्हा अॅड. विजय चौगुले, रावसाहेब चौगुले, अविनाश पाटील, स्वप्नील चौगुले, बाजीराव थोरवत यांनी सर्व शेतकऱ्यां सोबत या मोजणीस विरोध केला. या महामार्गामध्ये ४० विहीर, ६० कुपनलिका जातात. तसेच तोकडीच जमिनीमुळे काही शेतकरी भुमिहीन होऊन अनेक शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असून जिने मुश्किल होणार आहे. जिरायती शेतीमध्ये कर्जे काढून पाणी पुरवठा माध्यमातून शेती ओलीताखाली आल्याने या प्रकल्पातील बहुतांश बागायती शेती झाली आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी वर्ग भिकेकंगाल होणार आहे.असे लेखी निवेदन संबधित अधिकाऱ्यांना देऊन या महामार्गास कायमचा विरोध दर्शविला. या वेळी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होता.
निवेदनाच्या प्रती माहितीसाठी, जिल्हाअधिकारी,उपजिल्हाअधिकारी(भूसंपदान)क्र ६कोल्हापुर, उपमहाप्रबंंधक तथा प्रकल्प निर्देशक परियोजना कार्यालय इकाई भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर, उपविभगिय अधिकारी इचलकरंजी विभाग, तहसीलदार हातकणंगले,तालुका कृषि अधिकारी हातकणंगले, वन क्षेत्रपाल हातकणंगले, उपअ भियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले,गाव कामगार तलाठी, यांच्याकडे पाठिविल्या आहेत.
यावेळी माजी सभापती राजेश पाटील,माजी उपसरपंच संदीप चौगुले,उपसरपंच विजय भोसले, पोपट चौगुले,सुभाष चौगुले ,अशोक चौगुले,सुनील पाटील,राजगोंड पाटील, दादासो चौगुले,माणिक लाड, प्रकाश चौगुले,नितिन पाटील, संतोष खोत,गुंडु परमाज,प्रमोद माने, सतीश काशिद व शेतकरी उपस्थित होते.
चौकट
रत्नागिरी सांगोला राज्य महामार्गा मध्ये अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जमीनी जात असल्यामुळे त्यांच्या रोजी रोटी चा प्रश्न निर्माण झाला असून जर शासनाने जबरदस्ती करत बळ जबरीने या जमीनी शेतकऱ्यांच्या पासून हीरावुन घेण्याचा प्रयत्न केल्यास गोफन आणि लगोरी घेऊन आंदोलनात सहभगी होतील असा गर्भित ईशारा शेतकऱ्यांनी दिला.
फ़ोटो
हेरले गावचे शेतकरी व माजी सभापती राजेश पाटील लेखी निवेदन भूमिअभिलेख अधिकारी अमोल क्षीरसागर व भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग कोल्हापूर प्राधिकरण अधिकारी आर डी काटकर यांना देताना शेजारी अन्य शेतकरी