मौजे मुडशिंगी ( ता. हातकणंगले)
गावातील युवकांचा सामाजिक सेवेसाठी निःस्वार्थ पुढाकार घेऊन गावात प्रथमच पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा एक पाऊल हरितक्रांती कडे हा उपक्रम गावचे प्रथम नागरिक सरपंच मीनाक्षी खरशिंगे यांचे पती प्रकाश खरशिंगे व आबा वरिंगे यांनी श्रमदानास सुरूवात करून युवा पिढीस श्रमदान चळवळीत कार्यान्वीत केले आहे.
पाणी म्हणजे जीवन पाण्याविना मनुष्य अथवा ही सृष्टी जिवंत राहू शकत नाही. नेहमी गावामध्ये उन्हाळ्यात पाण्याची खुप टंचाई भासते. गावातील आया-बहिणींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हे कुठेतरी थांबायला पाहीजे म्हणून पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमात संघर्ष युवा मंच सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी नि:स्वार्थपणे श्रमदान केले. याचा फायदा असा झाला की श्रमदान करणा-यांची संख्या २ वरून ४०च्या वर गेली.संघर्ष युवा मंचचे सर्व सदस्य भूमीहीन असताना केवळ गावच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेली महिनाभर संघर्ष युवा मंच चे १०च्या वर सदस्य आपल्या सोयीनुसार ३ते४ तास श्रमदान करतात.
संघर्ष युवा मंचचा पुढाकार व बौध्द समाजातील तसेच गावातील युवकांच्या सहकार्यातून गेली कित्येक वर्षे गाळ भरून साचलेली दु:ष्काळ विहीर गावच्या मुलांना पोहण्यासाठी गाळमुक्त केली आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी राजेश पाटील यांचे विषेश सहकार्य लाभले. तसेच या मंडळामार्फत गेली ६वर्षे शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडा अशा विविध स्तरावर संघर्ष सामाजिक बहुउद्देशिय संस्था आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.
अशा उपक्रमासाठी गावातील सर्व तरूण मंडळे,ग्रामस्थ व राजकीय लोकांचे नेहमी सहकार्य असते.