*" "*
*कसबा बावडा,दि.२६:* प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी २६ जून हा दिवस राजर्षी शाहू महाराजांची जयंती म्हणून साजरा करण्यात आला. युवानेते मा.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू विद्यामंदिरच्या प्रांगणात असणाऱ्या शाहू महाराजांच्या प्रतिकृतीला पुष्पहार घालनेत आला.त्यावेळी विद्यार्थांनी छत्रपती शाहू महाराज की जय असा जयघोष केला.त्यावेळी नगरसेविका माधुरीताई लाड, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार,नगरसेवक अशोक जाधव,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,श्रीराम सोसायटीचे व्हाईस चेअरमन मदन जामदार,सामाजिक कार्यकर्ते अभिजीत जाधव,कुंडलिक परीट,प्रशांत पाटील,माजी नगरसेवक अजित पवार,गजानन बेडेकर,विजय बेडेकर,भारतवीर मित्रमंडळाचे कार्यकर्ते राजू चौगले,सचिन चौगले व इतर कार्यकर्ते व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,रजनी सुतार ,शुभांगी चौगुले,रमेश सुतार आदी उपस्थित होते.
यावेळी युवानेते ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शाळेतील मुलांना वह्या वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.त्यात भाषण स्पर्धेतील मयुरी कांबळे,श्रुती चौगुले,मृणाली दाभाडे,अनुष्का साठे,निशिका शिंदे,ऋतुराज कोरवी यांचा गौरव करणेत आला.
सदर प्रसंगी शाळेतील शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव ,सुजाता आवटी,जयश्री सपाटे,आसमा तांबोळी,शिवशंभू गाटे,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील,काळे मॅडम,मंगल मोरे त्याचबरोबर भागातील पालक व नागरिक आदी उपस्थित होते.