माजगाव वार्ताहर:—
पोर्ले तर्फ ठाणे येथील जिल्हा परीषदेच्या कुमार व कन्या शाळेंचा सुरु होणार्या सन २०१८/२०१९या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्या योजना व कोणते उपक्रम राबवायचे यासाठी आढावा बैठक घेणेत आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच आदरणीय श्री.प्रकाश रामराव जाधव हे होते.
सुरवातीला सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प देवुन स्वागत करणेत आले.शाळेच्या सद्य स्तिथीवर चर्चा करणेत आली व भविष्यात आणखी शैक्षणीक दर्जा वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दलच्या प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करणेत आली.
बैठकीला कुमार विद्या मंदीर पोर्ले चे शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी बापू खवरे व कन्या विद्या मंदीर पोर्ले चे शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष श्री.रामराव चेचर साहेब यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्राथमिक शिक्षक समिती.पन्हाळा चे अध्यक्ष श्री.गणपती मांडवकर यांनी मार्गदर्शन केले.
या आढावा बैठकतून जिल्हा परीषदेच्या शाळाबद्दल पदाधिकार्यांच्या मनामध्ये असलेली तळमळ दिसून आली.
बैठकीसाठी दोन्ही शाळेचे शिक्षक श्री.सी.डी.सावंत सर,श्री.गवळी सर,श्री.गुरव सर,श्री.गणपती मांडवकर सर,श्री.हिंदुराव काशीद सर,श्री.चौगले सर,श्री.प्रकाश पोवार सर,श्री.नामदेव पोवार सर,श्री.बाजीराव कदम सर,श्री.उबाळे सर,श्री.कांबळे सर उपस्तित होते.आभार श्री.मांडवकर सर यांनी मानले,